*नागरीकांनी शासन आपल्या दारी संकल्पनेचा लाभ घ्यावा - तेजल सोनवणे*
भोकरला ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत केवळ ११ अर्ज दाखल, ४५ अभा कार्डची नोंदणी
भोकर - प्रतिनिधी - समाचार -
सरकारने सुरू केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ योजनेत सरकारकडून नागरीकांचे सरकारी कामे गावीच पुर्ण व्हावेत यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. याच करीता सरकारने ‘जत्रा शासकीय योजनांची, सर्वसामान्यांच्या विकासाची’ अंतर्गत शासन आपल्या दारी हि संकल्पना राबवत आहे. या माध्यमातून जनतेच्या अनेक समस्या सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरीकांनी यात सहभाग नोंदवत लाभ घ्यावा असे आवाहन कामगार तलाठी तेजल सोनवणे यांनी केले.
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील जिल्हा परीषद शाळा प्रांगणात आयोजीत ‘शासन आपल्या दारी’ या योजनेचा शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रदिप ढुमणे, पशु वैद्यकीय अधिकारी दिलीप कोकणे, आारोग्य विभागााचे डॉ.अभिजीत ढाकणे, कृषी सहाय्यक रूपाली काळे, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक सेतू कार्यालयाचे विजय जाजू व सुजीत मोटकर, माजी उपसरपंच महेश पटारे, भागवतराव पटारे, सेनेचे दत्तात्रय पटारे, नामदेव चव्हाण, पत्रकार चंद्रकांत झुरंगे आदि प्रमुख उपस्थीत होते.
यावेळी आरोग्य विभाग, कृषी विभाग, महसुली विभाग, ग्रामपंचायत संदर्भातील विविध योजनांची माहीती संबधीत विभाग प्रमुख यांनी नागरीकांना दिली. या वेळी येथील नागरीकांकडून केवळ ११ अर्ज दाखल झाले, त्यात उत्पन्न दाखले ५, नॉनक्रीमीलेयर १, दुबार रेशनकार्ड १, रेशनकार्डमध्ये नाव समावेश करणे १, नवीन रेशनकार्ड करीता १, अन्नधान्य सुरू करण्यासाठी १, फळबाग मागणी अर्ज १ या प्रमाणे ११ अर्ज दाखल झाले तर आरोग्य विभागाचेवतीने ४५ हेल्थ कार्ड (अभा कार्ड) साठीची नोंदणी करण्यात आली.
यावेळी मनिष शिंदे, सोमनाथ पंडीत, बाबुराव अमोलीक, शैलेश दंडवते, कचरू वाकडे, दिपक गायकवाड, सखाराम आबुज, बनिचंद आहीरे, सुभाष सुरूसे, सोमनाथ पंडीत, कैलास लोखंडे, कल्पना बेरड, चंद्रकला चव्हाण, सुमन व्यावहारे, अलका ढाले, निर्मला चांदेकर, सुनिता कांगुणे, मिना बर्डे, शोभा लोखंडे, निर्मला अमोलीक, मिरा वाघुंबरे, भारती शेळके, मोहीनीबाई कपाटे, मंगलबाई पाचरव, सिमाबाई पंजाबी आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
*फोटो ओळी*
[[[ समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर ]]]
No comments:
Post a Comment