राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, May 29, 2023

*जग सुंदर आहे पण भारत सत्यम*,*शिवम,सुंदरम आहे = हरिश्चन्द्र करडे ?

श्रीरामपूर - प्रतिनिधी - वार्ता -
विदेश प्रवास म्हणजे जगाची जवळून ओळख करून घेणे होय.आम्ही युरोपचा प्रवास केला, अनेक देश पाहिले जगाची सुंदरता मनात भरली तरीही आपला भारतदेश हाच जीवन समाधान देणारा सत्यम, शिवम, सुंदरमचा प्रत्यय देतो,असे विचार अहमदनगर येथील हरिश्चन्द्र करडे यांनी व्यक्त केले. 
 येथील शेळके परिवार, वाचन संस्कृती प्रतिष्ठान, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान यांच्यातर्फे नुकताच युरोप प्रवास करून आलेल्या हरिश्चन्द्र करडे व सौ. शकुंतला करडे यांचा सत्कार आणि प्रवास अनुभवकथन कार्यक्रमात श्री करडे बोलत होते. यावेळी माजी प्राचार्य टी. ई. शेळके, जेष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये,सुखदेव सुकळे, डॉ. अमित करडे, डॉ. सौ. मीनाक्षी करडे, श्रीमती सुशीला नाचण आदी उपस्थित होते. युरोपमधील विविध देश पाहणारे श्री व सौ. करडे यांचा शाल, बुके, पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला.
श्री करडे म्हणाले,
महाराष्ट्रातील मराठी बोलणारे, पंजाबमधील काही ओळखीच्या प्रवाशामुळे १३ दिवसाचा प्रवासदौरा मनाला समाधान देणारा वाटला. मायभूमीची ओढ कायम मनात असते,आपल्या भूमीचा प्रेमजिव्हाळा उत्कटच वाटतो. इंग्लड, बेल्जीयम, ऑस्ट्रिया, फ्रान्स, जर्मनी, हॉलंड, स्वीझर्लन्ड, इटली, नेदरलँड, व्हॅटिकेनसीटी, ब्रुसेल आदी ठिकाणी भेट देताना जगाने खूप भौतिक प्रगती केल्याचे जाणवले. विज्ञान आणि मानवी बुद्धीचा आविष्कार दिसला तरीही भारतीय संस्कृती आणि जीवनमूल्ये मनात उंचच आहेत. व्याही प्राचार्य शेळके,डॉ. उपाध्ये, सुखदेव सुकळे यांनी केलेले सत्कार म्हणजे पुन्हा आनंदप्रवास घडला असे गौरवोद्गार श्री करडे यांनी काढले.डॉ. अमित करडे, डॉ. सौ. मीनाक्षी करडे यांनीही आनंद व्यक्त केला. प्राचार्य शेळके, डॉ. उपाध्ये, सुकळेसर यांनी करडे परिवाराच्या विदेश प्रवासाचे अभिनंदन केले. सौ. शकुंतला करडे यांनी आभार मानले.

(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))

No comments:

Post a Comment