नाशिक - प्रतिनिधि - वार्ता -
आषाढी एकादशी व बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर ड्राय डे असतांना व बंदी असलेली अवैध हातभट्टी गावठी दारु विक्रीच्या अवैध धंद्याविरोधात राज्य उत्पादन शुल्क, अ विभाग, नाशिक या पथकाने कारवाई करत तब्बल ५२० लिटर हातभट्टी गावठी दारु व इतर साहित्य जप्त केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, राज्य उत्पादन शुल्क अ विभाग, नाशिक या पथकाला मिळालेल्या झिरो पोलीस माहिती नुसार वाल्मिक नगर, पंचवटी, नाशिक याठिकाणी पंचवटी पोलिसांच्या मदतीने छापा टाकून ५२० लिटर हातभट्टी गावठी दारु, ०२ प्लॅस्टीक ड्रम, ०४ प्लॅस्टीक कॅन, १९ रबरी ट्युब आदी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला यावेळी मात्र सदरहू अवैध धंदा चालवणारा चेतन रवि पाटील हा फरार झाल्याने त्याला फरार घोषित करण्यात आले.
ही कामगिरी राज्य उत्पादन शुल्क, अ विभाग, नाशिक निरीक्षक योगेश सावखेडकर, दुय्यम निरीक्षक यशपाल पाटील, दुय्यम निरीक्षक भावना भिरड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मायकल पंडीत, जवान विरेंद्र वाघ, राहुल जगताप, विजय पवार व गणेश वाघ- यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सदरील कारवाई करिता व विभागाचे निरीक्षक सुनिल देशमुख व त्यांचा स्टाफ, क विभागाचे निरीक्षक जी. पी. साबळे व त्यांचा स्टाफ, नाशिक भरारी पथकाचे निरीक्षक जयराम जाखेरे व त्यांचा स्टाफ, तसेच पंचवटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रोहीत केदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, हवालदार कुलकर्णी, पोलीस नाईक नाईक, पोलीस नाईक शिंदे, पोलीस शिपाई महाले, यांनी मदत केली.
------------------------------------------------------------------------
=====================================
उप : - संपादक एस व्ही वाघ शब्द...✍️✅️🇮🇳... रचना संकलन वार्ता...
=====================================
------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment