श्रीरामपूर - प्रतिनिधि - समाचार
रयत शिक्षण संस्थेत दीर्घकाळ मराठी विषयातील विद्यार्थीप्रिय प्रा.रायभान दवंगे यांचा 'दप्तर'हा ग्रामीण कथासंग्रह समाजातील सामाजिक,शैक्षणिक जीवनातील सत्य परिस्थितीचे चित्रण करणारा आहे,ह्या कथा समाजप्रबोधनाची संस्कारशिदोरी असल्याचे मत टाकळीभान येथील साहित्यप्रेमी, टाकळीभान विकास सोसायटीचे मा.चेअरमन राहूल अप्पासाहेब पटारे पाटील यांनी व्यक्त केले.
टाकळीभान येथील साहित्य परिवारातर्फे आषाढी एकादशीनिमित्त प्रा. रायभान दवंगे यांच्या 'दप्तर 'ग्रामीण कथासंग्रहाचे परिसंवादात्मक पुस्तक प्रकाशन साहित्य परिवार दालनात संपन्न झाले, त्याप्रसंगी राहूल पटारे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी श्रीरामपूर येथील ॲड.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते. संयोजक व साहित्य परिवाराचे संस्थापक, अध्यक्ष कवी प्रा. पोपटराव पटारे पाटील यांनी स्वागत, प्रास्ताविक करून कमालपूर येथील स्व.प्रा.रायभान दवंगे यांचे साहित्यिक, शैक्षणिक योगदान सांगून एक प्रभावी ग्रामीण साहित्यिक असलेले प्रा. दवंगे यांचे प्रतिभाशाली व्यक्तिमत्व आणि साहित्य दुर्लक्षित राहिले आहे. त्यांच्या कथेवर चित्रपटआणि नाट्यप्रयोग नियोजन करण्यात आले होते.पुणे येथील टिळक सभागृहात महाराष्ट्रातील ज्या बारा प्रतिभासंपन्न साहित्यिकांचा सन्मान सोहळा झाला, त्यात प्रा. दवंगे यांना सर्वात मानाचा पुरस्कार लाभला,
त्यांचे निधन झाले पण त्यांच्या साहित्यकार्याचे महत्व लक्षात घ्यावे अशी अपेक्षा प्रा.पटारे यांनी व्यक्त केली.यावेळी प्रस्तावना लिहिणारे प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी कथासंग्रहाचे सामाजिक व वाड्.मयीन मूल्यमापन केले. प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी कोपरगांव येथील नोकरी करतानाचे प्रा.दवंगेविषयक अनुभव सांगितले.यावेळी सौ. सुनीताताई पटारेपाटील, सौ.अंजली पटारेपाटील, हेमंत पटारेपाटील, पंकज पटारेपाटील, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन लहू कोल्हे पाटील आदी उपस्थित होते.प्रमुख पाहुणे राहूल पटारेपाटील यांनी प्रा. दवंगे यांचे साहित्यिक कार्य व प्रेमळ, संवेदनशील स्वभाव अनुभव सांगितले.टाकळीभान ज्ञानज्योती बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष अर्जुन राऊत यांनी साहित्य परिवाराने आयोजित केलेला साहित्य उपक्रम हा साहित्यनिर्मितीला, ग्रामीण नवोदित साहित्यिकांना प्रेरणादायी, स्तुत्य असा कार्यक्रम असून प्रा. रायभान दवंगे यांच्यासारख्या गुणशील प्रभावी, ग्रामीण साहित्यकांची दखल घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला.प्राचार्य टी. ई. शेळके यांनी अध्यक्ष भाषणातून या उपक्रमाचे कौतुक केले.ते म्हणाले, टाकळीभान नाव उच्चारताच पटारेपाटील परिवार समोर येतो, या परिवाराने कौटुंबिक, सामाजिक,राजकीय, कृषी, व्यवसाय क्षेत्रात आदरणीय अशी प्रतिष्ठा प्राप्त केली आहे. प्रा.रायभान दवंगे यांचे ग्रामीण साहित्यात मोठे योगदान आहे. 'दप्तर 'या नावातच शिक्षणाचे महत्व लक्षात येते.ज्याने दप्तर पाहिले नाही, त्याला शिक्षण मिळतं नाही, दप्तर म्हणजे ज्ञानाची शिदोरी आहे,अशी ज्ञानशिदोरी देण्यासाठी, घेण्यासाठी अनेकांचे कष्ट, योगदान आहे. प्रा.पोपटराव पटारे, प्रा. डॉ बाबुराव उपाध्ये यांनी नगरजिल्ह्यात सतत दुर्लक्षित लेखक, कवींची दखल घेतली.स्वखर्चातून ते असे कार्यक्रम घेतात,ही खरी साहित्यसेवा म्हटली पाहिजे,असे उपक्रम प्रसिद्धसाठी, वृत्तपत्रात नाव येण्यासाठी नाहीत तर नि:स्वार्थ भावाने केलेली ही साहित्यभक्ती आहे. असे उपक्रम घेण्यासाठी तशी विचारधारा असावी लागते.वेळ, पैसा, नियोजन, लोकसंग्रह आणि निरपेक्षदृष्टी असावी लागते, साहित्य ही अमृतवाणी आहे.ती समाजपर्यत पोच करणे ही संवेदनशीलता पाहिजे.सगळेजण साहित्य उपक्रमाला प्रसिद्ध देतात असे नव्हे पण एखाद्या सेतूकार्यातील खारुताईसारखे हॆ कार्य छोटे असले तरी ते प्रामाणिक आहे, हॆ काम साहित्य परिवार, वाचन संस्कृती प्रतिष्ठान करीत आहे, असे सांगून प्राचार्य शेळके यांनी कथासंग्रहाचे महत्व सांगितले.प्रा. डॉ बाबुराव उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले तर हेमंत पटारे पाटील यांनी आभार मानले.
((( संकलन )))
समता न्यूज नेटवर्क,
श्रीरामपूर - 9561174111
No comments:
Post a Comment