नाशिक - प्रतिनिधि - वार्ता -
चाळीसगांव शहराकडे गुटखा घेऊन येणाऱ्या पिकअपला अडवून पिकअपमधील एकाला मारहाण करीत, पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना काल रात्री खरजई रोड परिसरात घडली आहे. मारहाणीतील जखमीला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर गुटख्याने भरलेली पिकअप शहर पोलिसांनी ताब्यात घेत पुढील कारवाई अन्न व औषध प्रशासन करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
काल खरजई रस्त्याने चाळीसगांवकडे येणारा पिकअप एमएज १९ सीएक्स ००८ ही गुटखा घेऊन येत असल्याच्या संशयावरून खरजई रस्त्यावर या पिकअपला अडविण्यात आले. तिच्यात गुटखा असल्याने उपस्थित जमावाने गाडीच्या काचा फोडत गाडीतील कोतकर नामक व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. या गाडीवरील चालक मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. जख्मी कोतकर यासरुग्णालयात
दाखल करण्यात आले, पोलिसांनी पिकअप ताब्यात घेतला असून पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे सोपविण्यात येणार आहे. आज दुपारी उशिरा पर्यंत अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी किंवा पथक चाळीसगांव येथे दाखल झालेले नसल्याने कार्यवाही करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे अधिक माहिती प्राप्त होऊ शकली नाही. गुटखा तस्कराने पिकअप मध्ये गुटखा असल्याचा संशय येऊ नये तो शेतीमालाची वाहतूक करणाराचा दिखावा, यासाठी केबिन वर शेतीमालाच्या जाळया ठेवल्या असल्याचे दिसून येते आहे.
---------------------------------------------------===================================सह.संपादक... रंजित बतरा...शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
===================================
---------------------------------------------------
No comments:
Post a Comment