राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, June 21, 2023

येत्या दि. २४ व २५ जून रोजी स्वराजप्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांचा नाशिक दौरा

बी.आर.चेडे -शिरसगांव

स्वराजप्रमुख छ्त्रपती संभाजी महाराज येत्या दिनांक २४ व २५ जून रोजी नासिक दौऱ्यावर येणार असून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वराज प्रदेश संपर्क प्रमुख महाराष्ट्र करण गायकर यांनी दिली.शनिवार दिनांक २४ जून रोजी छत्रपती संभाजी महाराज यांचे नासिक शहरात सकाळी ११ वाजता आगमन होणार असून सायंकाळी ४ वा.स्वराज पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा यश लॉंस, नांदूर नाका नासिक येथे होणार आहे.दिनांक २५ जून रोजी सकाळी १० वाजता रावसाहेब थोरात सभागृह गंगापूर नाका नासिक येथे छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी समितीच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास व मविप्र संस्था गौरव छत्रपती शाहू महाराज जीवन विचार व्याख्यानमाला कार्यक्रमास उपस्थिती तसेच दुपारी १ वाजता कालिदास कला मंदिर नासिक येथे राजश्री शाहू महाराज विचार जागर स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

((( वृत्तसंकलन )))

समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

No comments:

Post a Comment