राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, June 2, 2023

बेलापूरच्या पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावासाठी 'विनामुल्य' जमिन मिळवून दिल्याबद्दल नाम. विखे पा. यांचा सत्कार ?

श्रीरामपूर - प्रतिनिधधि - वार्ता -

तालुक्यातील बेलापूर बु - ऐनतपूर गावच्या जलजीवन मिशन अंतर्गत प्रगतीपथावर असलेल्या १२६ कोटी खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावासाठी शेती महामंडळाची साडे आठ एकर जमीन 'विनामुल्य' देण्याचा फेरनिर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत झाला.सदरची जमीन विनामुल्य मिळवून दिल्याबद्दल राज्याचे महसूलमंञी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा बेलापूर बु- ऐनतपूर ग्रामस्थांचे वतीने सत्कार करण्यात आला.बेलापूर-ऐनतपूरच्या पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावासाठी मंञीमंडळाच्या बैठकीत शेती महामंडळाची साडे आठ एकर जमिन देण्याचा निर्णय झाला होता.यासाठी जमीनीच्या  किमतीच्या दहा टक्के म्हणजे ३० लाख रुपये इतके जमिनीचे मुल्यांकन ठरविण्यात आले होते. तथापि महसूल मंञी नामदार राधाकृष्ण विखे पा.यांनी सदरची जमीन गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी द्यायची असून लोकहिताच्या कामासाठी देणार असल्याने सदरची जमीन विनामुल्य देणेबाबत आग्रही मागणी मुख्यमंञी एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्रिमंडळ बैठकीत केली. सदरची विनंती मान्य करुन सदर जमीन विनामुल्य देण्याला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.यामुळे ग्रापंचायतीला भरावे लागणारे ३० लाख रुपये वाचणार आहेत.सदर जमीन विनामुल्य मिळवून दिल्याबद्दल महसूल मंञी नाम. राधाकृष्ण विखे पा.यांचा ग्रामस्थांचे वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, अशोक कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन जालिंदर कुऱ्हे, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,भाजपा  सरचिटणीस प्रफुल्ल डावरे, हाजी इस्माईल शेख,तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरषोत्तम भराटे,तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ उर्फ लहानू नागले,अँड.अरविंद साळवी, पत्रकार दिलीप दायमा,प्रभात कुऱ्हे,शफिक बागवान,मोहसीन सय्यद,भाऊसाहेब तेलोरे,महेश कुऱ्हे,प्रशांत मुंडलिक,बाबुलाल पठाण,गोपी दाणी,दादासाहेब कुताळ,शशिकांत तेलोरे,सुनिल शहाणे,मास्तर हुडे,टिंकू राकेचा, राम कुऱ्हे,प्रभाकर लोखंडे आदी उपस्थित होते.

(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))

No comments:

Post a Comment