श्रीरामपूर प्रतिनिधि वार्ता
राजर्षी शाहू महाराज हे वारस हक्काने झालेले छञपती नव्हते, ते सामाजिक समतेचे पुरस्कर्ते होते. अस्पृश्यता निवारण, मागासवर्गीयांना आरक्षण आदी त्यांचे निर्णय दूरदर्शी होते, असे प्रतिपादन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.
लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने श्रीरामपूर येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी श्री.मुरकुटे यांनी सदरचे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, शाहू महाराजांनी केलेले कार्य हे ऐतिहासिक असेच होते. विसाव्या शतकात जेव्हा जातीयवादाचा पगडा होता त्याकाळात शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा पुरस्कार केला. मागासवर्गीयांना आरक्षण दिले. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेसह अनेकांना त्यांनी शिक्षणासाठी अर्थसहाय्य केले. जाती व्यवस्थेविरुद्ध ते ठामपणे उभे राहिले. शिक्षणाला त्यांनी प्राथमिकता दिली. जे पालक मुलांना शाळेत घालणार नाहित त्यांना आर्थिक दंड करण्याची तरतूद त्यांनी केली. राजर्षी शाहू महाराज हे ख-या अर्थाने सामाजिक समतेचे पुरस्कर्ते होते, असे श्री.मुरकुटे म्हणाले. याप्रसंगी अशोक बँकेचे चेअरमन अॅड्.सुभाष चौधरी, अॅड्.उमेश लटमाळे, दशरथ नांगळ, रोहित मालकर, प्रमोद करंडे, विलास नळे, दिलीप शिंदे, पंकज देवकर आदी उपस्थित होते.
अशोक उद्योग समूहाचे वतीने कारखाना कार्यस्थळावरही राजर्षी शाहू महाराज यांचे जयंती निमित्त कारखान्याचे व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कार्यकारी संचालक संतोष देवकर, शेतकी अधिकारी नारायण चौधरी, कार्यालय अधीक्षक विक्रांत भागवत, चीफ अकाउंटंट मिलिंद कुलकर्णी, ऊस विकास अधिकारी विजय धुमाळ, लेबर ऑफिसर आण्णासाहेब वाकडे, सॅनिटेशन इन्स्पेक्टर विलास लबडे, साळवे, दत्तात्रय तुजारे, बाळासाहेब मेकडे आदी उपस्थित होते.
वृत्तसंकलन
समता न्यूज नेटवर्क,
श्रीरामपूर - 9561174111
No comments:
Post a Comment