💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
चिखली - प्रतिनिधि - वार्ता -
खरं तर शासकीय अधिकारी तथा कर्मचारीयांचा हक्काचा व सुट्टीचा दिवस म्हणजे रविवार या दिवशी कोणतेही राजपात्रित तथा निमशासकीय अधिकारी शक्यतोवर कुणाचे ही फोन घेत नाही किंवा कुणाच्याच संपर्कात राहत नाही परंतु दि २५ जून रोजी मला माझ्या १७ वर्षाच्या वकिली व्यवसायामध्ये आज प्रथम सुखद धक्का मिळाला की आमच्या एकलारा गावचे समाधान बनकर माझ्याकडे आले असता त्यांनी त्यांच्या वडिलांचे आज संध्याकाळी ७ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात तातडीची शस्त्रक्रिया करायची आहे व त्यासाठी अंदाजे ५ लाखापर्यंत खर्च येणार असून आज सुट्टीचा दिवस असल्या कारणाने महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत जो लाभ मिळू शकतो त्यापासून मी वंचीत राहत आहे, त्यामुळे मला योजनेचा फायदा मिळवून देण्याची विनंती केली, कारण त्यांच्या वडीलांना जवळपास पाच लाख रुपये खर्च डॉक्टरांनी सांगितलेला होता व त्यांच्या जवळ फक्त एक लाख रुपयेच होते, त्यामुळे बनकर हे हाताश होऊन माझ्या निवासस्थानी आले असता त्यांनी आप बिती सांगितली असता आम्ही त्वरित चिखली तहसील कार्यालय गाठले परंतु रविवार असल्यामुळे कार्यालय बंद होते मग आम्ही लगेच रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील व पत्रकार एकनाथ माळेकर यांच्यासोबत संपर्क साधला, त्यांनी तात्काळ चिखली तालुका कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार मा. सुरेशजी कव्हळे साहेब यांच्याशी संपर्क केला व त्यांनी सदर रुघ्नांच्या नातेवाईकांना तात्काळ मदत करण्याचे आश्वासन दिले असता तहसीलदार साहेब बाहेरगावी असल्याने त्यांनी सचिन भुतेकर यांना सोबत घेऊन नायब तहसीलदार श्री संजय टाके साहेब यांच्या निवासस्थानी जायला सांगितले आणि आमच्या सोबत सकाळपासून कागदपत्रांच्या प्रतिक्षेत असलेले शे. रशीद शे. हुसेन रा . ब्रम्हपुरी ता.चिखली जि.बुलढाणा यांचे देखील कागदपत्रे घेऊन आम्ही गेलो आणि त्यांच्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया होण्यास रस्ता देखील सुकर झाला, महत्वाचे प्रमाणपत्र सुट्टीच्या दिवशी तहसीलदार सूरेश कव्हळे,नायब तहसीलदार संजय टाके व लिपिक सचिन भूतेकर व पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मळेकर आणि रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील व मी चिखली तालुका वकिल संघाचे मा.अध्यक्ष तथा समाजिक कार्यकर्ता ॲड.दिनेश जपे आम्ही सर्वानी केलेल्या छोट्याश्या प्रयत्नाने दोन्ही रुग्णांच्या महागड्या शस्त्रक्रियेचा मार्ग सुलभ झाला व काही प्रामाणिक अधिकाऱ्यांमध्ये आज देखील देवपण बघायला मिळत असल्याची आज प्रत्यक्ष प्रचीती आली असल्याचे ऍड. दिनेश जपे यांनी म्हटले व तहसीलदार कव्हळे साहेब व रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांच्यासह कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळेवर मदत करणाऱ्या त्या सर्वांचे बनकर व शेख कुटुंबियांनी आभार मानले.
संकलन
समता न्यूज नेटवर्क,
श्रीरामपूर - 9561174111
No comments:
Post a Comment