कोपरगाव - प्रतिनिधि - वार्ता -
तालुक्यातील ब्राम्हणगाव ते येसगाव या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ठेकेदारांनी घेतले मात्र गोदावरी डाव्या कालव्याजवळील नंबर २६२ मधील ९ शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान होऊनही संबंधित यंत्रणेच्या भोंगळ आणि बेजबाबदारपणामुळे रस्ता कामासाठी आणून ठेवलेल्या नळ्या ठेकेदारांनी उचलून नेल्या. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचेउपअभियंता श्री. शिंदे यांना सांगूनही कामाकडे दुर्लक्ष होत आहे. तेव्हा या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण केले नाही तर उपोषण करू, असा इशारा सुभाष शामराव गाडे यांच्यासह ९ शेतकऱ्यांनी दिला आहे.कामात गोदावरी डाव्या ते म्हणाले, ब्राह्मणगाव येसगाव रस्त्याचे ठेकेदारांनी काम २०१७ मध्ये घेतले होते. सदर रस्ता कालव्याजवळ पूर्वी सिमेंट नळ्या होत्या. मात्र त्याचा अडसर होता म्हणून त्यांनी त्या काढल्या. २२ सप्टेंबर २०२० रोजी अचानक अती पावसामुळे सुभाष शामराव गाडे, पुंडलिक शामराव गाडे, बाळासाहेब एकनाथ हुळेकर,नामदेव अण्णासाहेब बुहाडे, योगेश सोमनाथ नागरे, कोल्हे पाटील, पांडुरंग महिपत वाबळे, शेखर बोरावके, धोंडीराम महिपत वाबळे या शेतकऱ्यांचे कपाशी, मका, सोयाबीन, भाजीपाला आदी पिकांत गुडघ्याच्यावर पाणी साठले होते. पाणी जाण्यास पर्यायी मार्ग नसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतरही सतत पाऊस होऊन या सर्व शेतकऱ्यांना पिकात साठणाऱ्या पाण्याची डोकेदुखी निर्माण झाली. याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. याठिकाणी सिमेंटच्या नळ्या टाकल्या पण त्याचे कामच केले नाही. पाच वर्षांपासून संबंधित अधिकारी करतो, बघतो, आज होईल, नक्की होईल, तुम्ही आमदार खासदारांकडे जाऊ नका अशी साचेबध्द थातूरमातूर उत्तरे देऊन आम्हा शेतकऱ्यांची बोळवण चालू ठेवली आहे. २४ सप्टेंबर २०२० व त्यानंतर वेळोवेळी याबाबत संबंधित खात्याचे मंत्री व जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत निवेदने दिली होती. सिमेंट नळ्या ठेकेदाराने उचलून नेल्या. त्याबाबत कोपरगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. शिंदे तसेच त्यांचे सहकारी श्री. गाडे यांना भ्रमणध्वनीवर तक्रार करूनही या कामाकडे ते सपशेल दुर्लक्ष करीत आहेत. नळ्या न टाकल्यामुळे वारंवार पावसाळ्यात साठणारे पाणी जाण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने शेतकऱ्यांचे शेती पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. तीन पावसाळे पूर्ण झाले आता चौथा पावसाळा आला तरी हे काम अर्धवट स्थितीतच पडले आहे. तेव्हा हे काम तातडीने पूर्ण झालेनाही तर उपोषण करू, सहनशीलतेचा अंत आता संपला आहे, असा इशारा या सर्व शेतकरी बांधवांनी दिला आहे.
===================================
---------------------------------------------------
: - सह संपादक रंजित बतरा शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment