राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, July 1, 2023

महाराष्ट्र सुरक्षा बलाच कवच; ७४ जवानांची तुकडी दाखल साई मंदिराला शिर्डी...

शिर्डी - प्रतिनिधि - वार्ता -
आंतराष्ट्रीय ख्याती असलेल्या साईसमाधी मंदिराला गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर विशेष सुरक्षा बलाचे सुरक्षा रक्षक तैनात असणार आहे. शिर्डीत दिवसेंदिवस भाविकांची वाढती गर्दी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी होणारी दमछाक हे साई संस्थान सुरक्षेला व पोलीस सुरक्षा यंत्रणेला मोठं आव्हान होतं, तसेच मंदिराच्या पाचही गेटवर दररोज काहींना काही वाद होत होते तर विनापास प्रवेश करून अनेकजन भाविकांचे फुकट दर्शन घडवून स्वतःचा आर्थिक फायदा घेत होते. याचे वाढते प्रमाण व त्यामाध्यमातून वाढती गुन्हेगारी यावर नियंत्रण ठेवणे संस्थानला मोठे कठीण जात होते.
त्यातच साई संस्थानने गेट नं. ३ हे शिर्डी ग्रामस्थांसाठी दररोज दर्शनासाठी जाणाऱ्या ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून दिले होते, मात्र त्याठिकानीही ग्रामस्थांच्या नावाखाली अनेक लोक फुकटच्या दर्शनाचा लाभ घेत होते. तर ओळखपत्र हे फक्त नावालाच होते. त्यामुळे त्या गेटवर अनेक एजंट हे भाविकांकडून अव्वाच्या सव्वा भावात दर्शनाची सेटिंग करून प्रवेश देत होते. यावरून अनेकवेळा गेट नं. ३ वर बाचाबाची, हाणामाऱ्या झाल्याच्या घटना ताज्या आहेत. मात्र आता महाराष्ट्र राज्याची अग्रगण्य अशी महाराष्ट्र सुरक्षा बल ह्या यंत्रणेची नियुक्ती साई संस्थानने केली असून त्यासाठी करारही करण्यात आला आहे.
याची अंमलबजावणी २ जुलै अर्थात गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर केली जाणार असून सुरुवातीला ह्या विशेष पोलीस सुरक्षा बलाचे ७४ जवान शनिवारी दाखल झाले असून त्यांनी शनिवारी साईसमाधी मंदिर, मंदिर परिसर, दर्शनरांग, पाचही गेट याची सखोल पाहणी केली आहे. ही सुरक्षा यंत्रणा सुरक्षेचे घालून दिलेले सर्व नियम काटेकोरपणे पाळत असते त्यामुळे अनेकांनी याची धास्ती घेतली असून कामाशिवाय, ओळखपत्राशिवाय, विणापास, तसेच पाहुणे, मित्र यांना प्रवेश देणार नाही. या विशेष सुरक्षा यंत्रणेच भाविकांनी स्वागत केलं असून यापूर्वी मंदिर व मंदिर परिसरात चालत आलेले गैरप्रकारावर आता आळा बसणार आहे.

====================================
-----------------------------------------------------
: - कार्य संपादक भगवंत सिंग प्रितम सिंग बतरा शब्द... ✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
---------------------------------------------------
===================================


No comments:

Post a Comment