राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, August 8, 2023

पोलिसांनी पकडले पसार होण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चोरट्याना


वैजापूर - प्रतिनिधि - वार्ता -

शिऊर वैजापूर तालुक्यातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत दि.6 रोजी रात्री दोन चोरटयांनी एका महीलेच्या गळ्यातील पोथ हीसकावण्याचा तसेच शिऊर गावात जबरी चोरीचा प्रयत्न केला होता. पोलीसांना सुचना मिळताच पोनी संदीप पाटील यांनी तात्काळ ग्राम सुरक्षा दलातील लोकांना तात्काळ अलर्ट करून स्वतः पोलीसांचा सह शिऊर बंगला येथे राञी साडे नऊ वाजता नाकाबंदी लावली.
त्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे माहिती मिळाली की MH 41 Y 8505 डीस्कव्हर मोटरसायकल ही शिऊर गावाकडून शिऊर बंगल्याकडे भरधाव येत असल्याचे कळल्याने पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार यांच्या मोटरसायकल आडव्या लाऊन रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला. भरधाव येत असलेल्या दोन भामट्यांनी पोलीसांच्या गाड्या उडवल्या, मात्र त्यानंतर चोरटे खाली पडून अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

सपोनी संदीप पाटील यांनी तात्काळ आजुबाजुला असलेल्या मक्याच्या तसेच कपाशीच्या शेतात सर्च ऑपरेशन करून दोन आरोपींना पहाटे सहा वाजेच्या दरम्यान शिताफीने पकडले त्याच्या कडून मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवलेली आहे. शिऊर गावात महीनाभरात अनेक ठिकाणी चोऱ्या झाल्या त्यामध्येही याच आरोपींचा हात होता. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. अधिक तपास करावयाचा असल्यामुळे आरोपींचे नावे गुप्त ठेवण्यात आल्याचे पोलीसांनी सांगीतले. अन्य साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी मार्गदर्शनाखाली सपोनी संदीप पाटील, फौजदार आर.आर. जाधव, सुभाष ठोके, पो.कॉ. विशाल पैठणकर, भारत कमोदकर यांनी केली.

===================================
---------------------------------------------------
: - उप संपादक - विजेंद्र कुमार - शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
---------------------------------------------------
===================================


No comments:

Post a Comment