श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
येथील कॉंग्रेस पक्षाच्यावतीने देशाचे दिवंगत पंतप्रधान भारतरत्न राजीवजी गांधी यांची जयंती सद्भावना दिवस म्हणून साजरी करण्यात आली.
या प्रसंगी काॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बॅंकेचे संचालक करणदादा ससाणे, माजी जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, कॉंग्रेस सेवादलाचे जिल्हा मुख्य समन्वयक मास्टर सरवरअली सय्यद,सेवादलाचे शहर अध्यक्ष रावसाहेब आल्हाट, अशोक जगधने, अल्पसंख्यांकचे नवाजभाई जहागीरदार, विद्यार्थी कॉंग्रेस चे सनी मंडलिक, कॉंग्रेस शहर चिटणीस नजीरभाई शेख़, सागर मगर,युनूस पटेल,सुरेश ठुबे, बुऱ्हाण जमादार तसेच सेवादलाचे व युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी कॉंग्रेस सेवादलाचे जिल्हा मुख्य समन्वयक मास्टर सरवरअली सय्यद यांच्यावतीने भारतीय संविधानातील तरतुदीनुसार सर्व जाती - धर्मातील एकता,समानता अबाधित रहावी अशी उपस्थितांना सद्भावनेची शपथ देण्यात आली.
===================================
---------------------------------------------------
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment