💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*युथ कराटे फेडरेशन कडून खेळाडूंना स्पोर्ट्स स्कॉलरशिप प्रदान !*
अहमदनगर -प्रतिनिधि - वार्ता -
नुकत्याच राजस्थान या राज्यातील जयपूर येथे दि.८ ते ११ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या खेल कराटे लीग सिजन २ मध्ये, अहमदनगर शहरातील मुकुंदनगर भागातील युथ कराटे फेडरेशन मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या ८ खेळाडूंनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आणि त्यात उल्लेखनीय कामगिरी करत ३ सुवर्ण १ रजत आणि ४ कांस्य पदकांची कमाई केली असल्याने त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेल कराटे मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा यावेळी मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या खेळाडूंना प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय कराटेपटू सबील सय्यद आणि साहील सय्यद यांनी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले होते. आंतररष्ट्रीय दर्जाच्या खेल कराटे लीग मध्ये नगरच्या खेळाडूंचा समावेश होणे ही नगरकरांसाठी अभिमानाची बाब आहे.
युथ कराटे फेडरेशन च्या , शुक्रवार दिनांक २२ सप्टेंबर २०२३ रोजी विजेत्या खेळाडूंचा सत्कार समरंभ मोठ्या उत्साहात मुकुंदनगर येथील एन. एम. गार्डन येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर महानगरपालिका आयुक्त पंकज जावळे तर प्रमुख उपस्थितीमध्ये सामाजिक कार्यकर्ते हाजी शाहबाज सय्यद , सी.आय.व्ही सोसायटी चे चेअरमन आरिफ सय्यद,माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक, गुलशन कंपनी चे जिशान शेख , सामाजिक कार्यकर्ते जुबेर सय्यद , पत्रकार अफझल सय्यद , डॉ. शबनम इम्रान शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेल कराटे मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यामध्ये खेल कराटे लीग मधील सुवर्ण पदक विजेते महेक मतीनखान पठाण,आरफा नियाजअहमद शेख , इब्राहिम तय्यब शेख यांना युथ कराटे फेडरेशन कडून मनपा आयुक्तांच्या हस्ते स्पोर्ट्स स्कॉलरशिप प्रदान करण्यात आली.
रजत पदक विजेता याहया मुदस्सर सय्यद, कास्यपदक विजेते आलिया अफजल सय्यद, अशाज अर्शद शेख , अहमद ताहीर शेख, अरकम मोहसीन सय्यद यांना सामाजिक कार्यकर्ते हाजी शाहबाझ सय्यद यांच्या वतीने सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
कराटे खेळाचा दर्जा वाढविण्यासाठी नेहमीच प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी हाजी शाहबाज सय्यद यांनी यावेळी दिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अफजल सय्यद यांनी केले. तर आभार प्रदर्शन माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक यांनी केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी युथ कराटे फेडरेशनच्या सर्व सदस्यांनी तथा हाजी शाहबाज सय्यद यांनी विशेष परू घेतले.
===================================
---------------------------------------------------
*सहयोगी:*
गुलामरसुलभाई (GM) अहमदनगर
*संकलन:* ✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment