राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, September 24, 2023

तीन सराईत गुन्हेगार जेरबंद सात्रळ माळेवाडी दरोड्यातील...

अहमदनगर - प्रतिनिधि - वार्ता -

 सात्रळ माळेवाडी येथील राहुरी तालुक्यातील दरोड्यातील आरोपींना मुद्देमालासह पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहमदनगर व राहुरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून आरोपी पकडण्यात पोलिसांना यश मिळविले आहे. यातील आरोपी आष्टी, जिल्हा बीड येथील आहेत. तसेच या प्रकरणात पाथर्डी येथील एका सुवर्ण व्यावसायिकालाही पोलिसांनी आरोपी केले असून तो फरार आहे.
सात्रळ माळवाडी येथे दरोड्याचा गुन्हा घडल्यानंतर गुन्ह्याचा प्राथमिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक धनंज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशल वाघ, पो . हवा, जयभाय, पो. ना. कोकाटे, दिपक फुंदे, यांनी सुरू केला होता. सदर गुन्ह्याच्या प्राथमिक तपासात गुन्ह्याच्या ठिकाणी आरोपींचे ठसे मिळाले होते ते ठसे चलाखीने, हुशारीने सुरक्षित करण्याची कामगिरी लोखंडे व त्यांच्या पथकाने केली होती. अंगुली मुद्रा शाखेकडील प्रशिक्षित तज्ञ पोलीस अंमलदार यांनी सदरचे ठसे डेव्हलप करून आरोपी निष्पन्न केले होते.

निष्पन्न केलेल्या आरोपींना आष्टी, बीड येथून शिताफीने अटक करण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व त्यांच्या पथकाने चोख बजावली. यामध्ये राम बाजीराव चव्हाण (वय- २२ वर्षे, रा. आष्टी, जि. बीड), तुषार हबाजी भोसले (वय- १९ वर्षे, रा. पिंपरखेड, जि. बीड), रियाज बशीर शेख (वय- ४९ वर्षे, रा- आष्टी, जि. बीड) या तिघा आरोपिंना अटक केली आहे. अटक केलेले आणि निष्पन्न झालेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगीतले आहे.

===================================
---------------------------------------------------
: - सह, संपादक - रंजित बतरा - शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
---------------------------------------------------
===================================



No comments:

Post a Comment