मुंबई - प्रतिनिधि - वार्ता -
मनसे पुन्हा एकदा आक्रमक राज्यातील टोलच्या विषय संदरबात झाली आहे. काही दिवसांपूर्वी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी ठाण्यात टोलच्या प्रश्नावर बेमुदत उपोषण केले होते. त्यानंतर स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन त्यांना उपोषण मागे घेण्यास सांगितले होते. तसेच पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला उद्देशून राज्यातील टोलनाके जाळून टाकण्याचा इशारा दिला होता. यानंतर आज (१२ ऑक्टोबर) रोजी राज ठाकरेंनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर आता या भेटीवर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, "मी तुम्हाला एकच वाक्य सांगणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली. परंतु, या चर्चेनंतर त्याच्या निर्णयापर्यंत येणे याच्यासाठी उद्या सकाळी ८ वाजता माझ्या घरी बैठक आहे. त्या बैठकीत काय निर्णय होतो याबाबत मी १० वाजता पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे. मुख्यमंत्री पूर्ण सकारात्मक आहेत. टोलबाबत कोणत्या गोष्टी होणार, काय निर्णय होणार हे मी उद्या सकाळी सांगेन. पोलिसांच्या घराबाबतही चर्चा झाली", अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.
दरम्यान, यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत टोलनाक्याजवळ किंवा रस्त्यांवर टॉयलेट नाही. येलो लाइनचे नियम पाळले जात नाहीत. ट्रॅफिक असेल तरीही कर घेतला जातो. गाड्यांची संख्या वाढत असताना करवसुली कमी कशी? यासाठी गाड्यांची संख्या मोजण्यासाठी व्हिडिओग्राफी करण्यात यावी. कर घेऊनही रस्ते खराब असतात. रस्त्यावर अपघात झाला तर लगेच क्रेन, रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. रस्ते कर घेतला जातो तर टोल कशाला? असे अनेक सवाल उपस्थित करण्यात आले आहेत
===================================
---------------------------------------------------
: - सह,संपादक - रंजित - बतरा -शब्द...✍️✅🇮🇳... रचना संकलन वार्ता...
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment