राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, October 18, 2023

*ख्यातनाम अभिनेञी प्राजक्ता गायकवाड हिच्या उपस्थितीत लोकसेवा विकास आघाडी व जिद्द फाउंडेशनची दांडीया स्पर्धाः सौ.मुरकुटे*🌹🥀🌺🌷🌸🙏❤️ ✅ 🇮🇳...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
लोकसेवा विकास आघाडी व जिद्द फौंडेशनच्या वतीने नवराञोत्सव निमित्त शुक्रवार (ता.२०) रोजी सायं.५ वा.उत्सव मंगल कार्यालय येथे दांडीया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.याप्रसंगी स्वराज मालिका फेम अभिनेञी प्राजक्ता गायकवाड उपस्थित राहणार असल्याची माहिती जिद्द फाउंडेशनच्या संस्थापक तथा लोकसेवा विकास आघाडी नवराञ उत्सव समितीच्या स्वागताध्यक्ष सौ.मंजुश्रीताई मुरकुटे,अध्यक्ष रोहन डावखर व कार्याध्यक्ष नाना पाटील यांनी दिली.
           लोकसेवा विकास आघाडीने माजी आ.भानुदास मुरकुटे व संस्थापक सिद्धार्थ मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली नवराञोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त विविध सांस्कृतिक उपक्रम साजरे होत आहेत. शुक्रवार ता.२० आॕक्टोबर रोजी उत्सव मंगलकार्यालय येथे ख्यातनाम अभिनेञी प्राजक्ता गायकवाड हिच्या उपस्थितीत दांडीया स्पर्धा संपन्न होणार आहेत.
स्पर्धेसाठी लहान वा मोठा असे दोन गट असतील.लहान गटासाठी रु.५ हजार (प्रथम) रु.३ हजार (व्दितिय) रु.२ हजार (तृतीय) तर मोठ्या गटासाठी रु.७ हजार (प्रथम) रु.५ हजार (व्दितिय) व रु.३ हजार (तृतिय) अशी बक्षिसे देण्यात येतील.तरी सदर स्पर्धेस प्रतिसाद द्यावा असे आवाहन सिध्दार्थ मुरकुटे,मंजुश्री मुरकुटे,रोहन डावखर,नाना पाटील,गणेशसिंग राजपूत, विशाल धनवटे,प्रमोद करंडे,वैभव सुरडकर,भास्कर खंडागळे यांनी केले आहे.

===================================
---------------------------------------------------
*सहयोगी:*✍️✅🇮🇳
पत्रकार इम्रान एस.शेख - श्रीरामपूर
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 
*9561174111*
---------------------------------------------------
===================================



No comments:

Post a Comment