श्रीरामपूर - प्रतिनिधी - वार्ता -
दत्तनगर ग्रामपंचायत हद्द भैरवनाथनगर ग्रामपंचायत, श्रीरामपूर शहर त्याचबरोबर शिरसगांव हद्दीतील रेल्वे लाईन परिसरामधील उत्तर व दक्षिण भागातील अनेकांना रेल्वे प्रशासनाने अतिक्रमणीत जागा असले बाबतच्या नोटीसा देऊन सदरच्या जागा ताब्यात घेण्याचा घाट घातला होता, तसेच नव्याने प्रस्तावित रेल्वे माल धक्क्यामुळे नेवासा रोड वरील अनेक घरे व दुकाने रेल्वे प्रशासन काढणार होते, तसेच तेथील माल धक्क्यामुळे उडणाऱ्या सिमेंट मिश्रित धुळीमुळे विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले होते यामुळे वरील परिसरातील सर्व व्यापारी रहिवासी यांच्यामध्ये मोठे भितीचे वातावरण निर्माण झाले होते, या विस्थापित होऊ पाहणाऱ्या सर्व नागरिकांनी कामगार नेते नागेश भाई सावंत, आपचे नेते तिलक डुंगरवाल, शिवसेनेचे नेते सचिन बडदे, संजय गांगड, विकास डेंगळे यांच्याकडे धाव घेतली यांनी जनआंदोलन उभे केले होते, याची दखल स्थानिक भाजपा नेते तालुकाध्यक्ष दीपक पठारे, विधानसभा प्रमुख नितीन दिनकर यांनी घेऊन यांचा नामदार राधाकृष्ण विखे पाटील खासदार डॉ.सुजयदादा विखे पाटील यांच्याशी संपर्क साधून रेल्वे प्रशासनामुळे विस्थापित होऊ पाहणाऱ्या नागरिकांच्या वतीने चर्चा घडवून आणली होती, यावेळी आम्हाला विस्थापित करू नका या मागणीचे निवेदन नुकतेच त्यांना दिले होते या निवेदनासंदर्भात नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी संपर्क साधून रेल्वेने जागा धारकांना दिलेल्या नोटीसीतील कारवाईबाबत मध्यस्थी घडवून आणावी अशी मागणी त्यांच्याकडे केली होती व श्रीरामपुरातील विस्थापित होऊ पाहणाऱ्या नागरिकांशी चर्चा करून तडजोड घडून आणावी असेही त्यांनी सांगितले.
या संदर्भामध्ये रेल्वेमंत्री ना .रावसाहेब दानवे यांच्यासोबत नागरिकांची बैठक घेण्यात आली, त्यावेळेस नामदार दानवे यांनी विखे पाटील यांच्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई करू नका असे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले त्यामुळे सणासुधीच्या काळात आपले घर / दुकान जाते की काय अशा भीतीच्या वातावरणामध्ये असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला, रेल्वे खात्याकडून होणारी कारवाई थांबवली गेली म्हणून श्रीरामपुरातील विस्थापित होऊ पाहणाऱ्या नागरिकांच्यावतीने पूर्व भागाच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी कामगार नेते नागेशभाई सावंत आपचे नेते तिलक डुंगरवाल,
माजी नगरसेवक हाजी मुख्तारभाई शाह,संजय गांगड, विकास डेंगळे, नाना गांगड, प्रशांत कटके, राहुल रणपिसे, युवराज घोरपडे, सोनाबाई रजपूत, मुबारक शेख, प्रवीण जोजारे, मेहबूब शेख, अलीमभाई शेख, रामनानी, मोहन अग्रवाल,गणेश कटके,प्रसाद कटके, मुबारक शेख,सुरेखा लोळगे, मंगल लोळगे, मनीषा मोरे, लिलाबाई थोरात, मायावती शिरसाठ, सुशीला सुपेकर, अन्नपूर्णा खंदारे, गौरी सोनवणे, शकीला पठाण, सुनिता सुपेकर ताराबाई अवताडे सिंधू नागुडे राणी सूर्यवंशी आरती सूर्यवंशी विजय शेटे, अश्विनी लोळगे, ताराबाई लोळगे, वैष्णवी कराळे, हिराबाई भराडकर,अंबिका सुपेकर, श्री लोळगे जयश्री, लोळगे राधिका, सुपेकर ज्योति, शिरसाठ स्वाती, खंदारे उषा, पांजरे भिमाबाई ,पांजरे कांताबाई गायकवाड, सारिकाअवताडे,
अमित मिरीकर,गणेश खैरनार, राजू गायकवाड, निखिल अग्रवाल,अनिस भाई शेख, राजेंद्र बोरकर, गिरीश गायकवाड, विशाल गायधने, योगेश वाकचौरे, विजय लांबोळे, राजेंद्र येवलेकर, अविनाश गव्हाणे, जयेश परमार, संतोष खाडे, गणेश भडांगे, चंद्रकांत रजपूत, उमेश अग्रवाल, मोहन अग्रवाल, सोमनाथ पवार, नितीन मोरे, संदीप गायकवाड, प्रशांत बागुल, हरीश लोळगे, गणेश शेटे, राजू सुपेकर, सोमनाथ मोरे, मनीष लुक्कड किरण झिरमिटे, राजू गायकवाड, विनोद शिरसाठ, शंकर गायकवाड, मोहसीन कोथमिरे, आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
===================================
---------------------------------------------------
*पत्रकार दीपक कदम - श्रीरामपूर*
( *सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ)
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment