राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, October 6, 2023

*सैनिकाच्या परिवारास वहिवाट रस्ता मिळावा याकरिता त्रिदल सैनिक सेवा संघाचे तहसीलदारांना निवेदन*


श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता

तालुक्यातील वडाळा महादेव येथील रहिवासी माजी सैनिक खलाटे सावित्रा नरेशराव व सध्या सेवेत असलेला सैनिक प्रशील दिगंबर शिरसाठ जे सध्या मणिपूरच्या म्यानमार बॉर्डरवर अति संवेदनशील असलेल्या ठिकाणी मातृभूमीची सेवा करत आहेत, 
या दोन्ही सैनिकांचे कुटुंब ज्या ठिकाणी राहत आहेत त्या ठिकाणी ३० ते ३५ लोकांची लोकवस्ती अनेक वर्षांपासून आहे परंतु वस्तीवर जाण्या - येण्याकरिता रस्ता नसल्याकारणाने अनेक दिवसांपासून त्यांनी रस्त्याची मागणी केलेली आहे,परंतु अद्यापही त्यांना रस्ता मिळाला नसल्याने वस्तीवरील अनेक विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी शेजारील असलेल्या मोठ्या ओढ्यातून ये - जा करतात, पावसाच्या दिवसांमध्ये या मुलांचं शाळेत जाणं अशक्य होते, त्याचप्रमाणे त्या वस्तीमध्ये वृद्ध ,महिला,लहान मुले अनेक मोठ्या प्रमाणात रहिवास करत असल्याने व रस्ता नसल्याने तेथे आरोग्या विषयी प्रश्न निर्माण झाल्यास तसेच मशागतीसाठी मोठी अवजार ,साधन व उत्पन्न निघाल्यानंतर उत्पन्न घरी घेऊन जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा मोठा व पुरेसा रस्ता नसल्याने या लोकांची ससेहोलपट होवून मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, त्या अनुषंगाने या वस्तीमधील अगोदर सुरू असलेला रस्ता जो ओढ्याच्या कडेने होता त्याचे रूंदीकरण करणे आवश्यक आहे, किंवा पर्यायी दुसरा रस्ता मिळावा त्या अनुषंगाने आजी सैनिक व माजी सैनिक या दोघांनी त्रिदल सैनिक सेवा संघाकडे लेखी स्वरूपात तक्रार अर्ज देऊन रस्ता मिळणे बाबत संघटनेच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळावा अशा पद्धतीची मागणी केली असल्याने त्रिदल सैनिक सेवा संघाने तात्काळ या तक्रारीची दखल घेऊन वस्तीवरील सर्व रहिवासी व आजी-माजी सैनिक यांना बरोबर घेऊन मान. तहसीलदार श्रीरामपूर यांना निवेदन सादर केले. याप्रसंगी त्रिदल सैनिक सेवा संघाचे अहमदनगर उत्तर विभागाचे उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार ,तालुकाध्यक्ष संग्रामजीत यादव, बाळासाहेब बनकर ,रवींद्र कुलकर्णी, शामवेल शिरसाठ , संजय जेजुरकर, पुंडलिक शेंडगे, सौ.श्रद्धा बावके दीपक गायकवाड, नारायण गायकवाड, सौ.रोहिणी महाले ,सुनिता जेजुरकर, तेरेजा शिरसाठ, नंदू गायकवाड, सचिन जेजुरकर, लक्ष्मण सोनवणे ,इत्यादींच्या निवेदनावर सह्या आहेत.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

No comments:

Post a Comment