💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
राजेंद्र - बनकर - शिर्डी -
शिवसेनेच्या महिला आघाडीच्या माध्यमातून केलेल्या कामाची दखल म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खासदार श्रीकांत शिंदे, उपसभापती निलमताई गोरे, आमदार मनिषा कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुखपदी निवड केल्याचे पत्र विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबई येथे सुरेखा भगवान गव्हाणे यांना नुकतेच देण्यात आले आहे,
सुरेखा गव्हाणे यांनी या अगोदर संगमनेर अकोले या दोन विधानसभा मतदारसंघात काम केले आहे, शिवाय शिर्डी लोकसभा मतदारसंघात देखील त्यांचा मोठा जनसंपर्क असुन मतदार संघाचा त्यांना बारीक सारीक माहिती असल्यामुळे पक्षाला त्यांच्या अनुभवाचा फायदा होणार आहे त्यामुळे पक्षाने त्यांच्या कामाची दखल घेत ही जवाबदारी सोपवली आहे असे नियुक्तीपत्र देताना खा. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. यावेळी सुरेखा गव्हाणे यांनी सांगितले की पक्षाने दिलेली जबाबदारी व केलेल्या कामाचा सन्मान याची पावती आपण कामातून देणार असुन पक्षसंघटन व पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असुन शासनाने केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी वचनबद्ध असल्याचे सांगितले या निवडीबद्दल खासदार सदाशिवराव लोखंडे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, बाजीराव दराडे,बाळासाहेब पवार, महिला आघाडी अध्यक्षा विमलताई पुंडे, कावेरी नवले, मिनाक्षी वाकचौरे, सुनिता शेळके, पुनम जाधव, सुरेखा गुंजाळ, वनिता जाधव यांनी समाधान व्यक्त केले आहे.
===================================
---------------------------------------------------
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment