अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा
भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम जाहीर केला असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी, अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
*या कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक*
*खालीलप्रमाणे आहे*
२७ ऑक्टोबर २०२३ एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे, २७ ऑक्टोबर ते ९ डिसेंबर २०२३ दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी, ४,५ नोव्हेंबर व २५, २६ नोव्हेंबर, २०२३ विशेष मोहिमांचा कालावधी (प्रत्येक मतदान केंद्रावर), २६ डिसेंबर २०२३ दावे व हरकती निकाली काढणे १ जानेवारी २०२४ अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्याची छपाई, ५जानेवारी, २०२३ मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार दि. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी, सहा मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय संबधित मतदान केंद्रावर प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करावी. दि.१ जानेवारी, २०२४ दि.१ एप्रिल २०२४ दि.१ जुलै २०२४ व दि.१ ऑक्टोबर, २०२४ रोजी १८ वर्ष पूर्ण करणा-या मतदारांनी नमुना ६ अर्ज भरून द्यावेत व त्या त्या अर्हता दिनांकास त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट केले जाईल. दि.२७ ऑक्टोबर २०२३ ते दि. ०९ डिसेंबर २०२३ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. यात नागरिकांनी जास्तीत जास्त मतदार म्हणून नाव नोंदणी करावी व नागरिकांनी नावाची खातरजमा करून नाव समाविष्ट करणे, नाव, पत्ता बदल करणे, नावांची वगळणी करणे इ. बार्बीकरीता नमुना ६,७,८ भरून देण्यासाठी आपले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ) अथवा तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा. तसेच ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये एका विशेष ग्रामसभेचे आयोजन दि. २७ ऑक्टोबर २०२३ ते दि.०४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत करण्यात येणार आहे. या काळात ग्रामसभेमध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्या अंतर्गत
नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या स्त्रिया, गावात कायमस्वरुपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल. तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरूपी स्थलांतरीत झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावांची मतदार यादीतून वगळणी केली जाईल. या कार्यक्रमामध्ये युवा मतदारांची नौदणी वाढण्यासाठी महाविद्यालयामध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट मतदार मित्र महाविद्यालय पुरस्काराचे आयोजन करण्यात येणार आहे. शंभर टक्के मतदार नोंदणी केलेल्या आणि मतदार जागृती उपक्रम राबविणा-या महाविद्यालयांना पुरस्कार दिले जाणार असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
===================================
---------------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:* ✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment