चंद्रपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तहसीलदार रविंद्र होळी आणी कोरपना तहसीलदार महेंद्र वाकलकर आणी खनिजकर्म अधिकारी .श्री नैताम यांच्या संपत्तीची एस आय टी मार्फत चौकशी व्हावी अशा मागणीचे निवेदन भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया चे संस्थापक अध्यक्ष अय्यूबभाई कच्छी आणी पदाधिकाऱ्यांमार्फत मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना देण्यात आले.
या निवेदनात असे म्हटले आहे की,चंद्रपुर जिल्ह्यातील मूल तहसील कार्यालयात कार्यरत तहसीलदार रविंद्र होली आणी कोरपना तहसील कार्यालयात कार्यरत तहसीलदार महेंद्र वाकलकर यांच्या गैरकारभाराबाबत अनेक तक्रारी येत असून काही दिवसांपासून प्रसार माध्यमात यांच्या गैरकारभाराच्या बातम्या देखील सातत्याने प्रकाशित होत आहे,
मात्र वरिष्ठ अधिकारी आणी संबंधीत महसूल प्रशासन यावर उचित कार्यवाही करणेबाबत का टाळाटाळ करत आहे,त्यांचेही सदरील प्रकरणी हात ओले तर होत नाहीना? असा संशय बळावत आहे.
आपल्या कार्यकाळात या दोन्ही अधिकाऱ्यांनी संबंधित रेती (वाळू) घाट ठेकेदारांशी संगनमत करून अनैतिकतेच्या मार्गाने या कोट्यावधींची आडमाफ बेनामी संपत्ती जमा केल्याचे बोलले जात असुन शासनाच्या गौनखनिज संपंतीची ज्यांना रक्षा करण्यासाठी नेमले तेच भक्षक बनल्याचे चित्र दिसून येत आहे.
अशा प्रकारे जेव्हा रक्षकच भक्षक बनतील तर मग शासनाच्या संपंतीचे रक्षण करणार कोण?
याकरीता सामाजिक संघटनांना पुढाकार घेणे क्रमप्राप्त ठरत आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या मुल आणी कोपरना या दोन्ही तालुक्यातील विद्यमान तहसीलदार यांनी गैरमार्गाने कमावलेल्या आडमाफ संपत्तीची सखोल चौकशी होणे कामी भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया चे संस्थापक अध्यक्ष अय्यूबभाई कच्छी यांच्या वतीने दि. २७ ऑक्टोंबर २०२३ रोजी मा. जिल्हाधिकारी चंद्रपुर यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की,नलेश्वर मोकासा आणी चकनलेश्वर रेती घाट या दोन्ही घाटांवरील घाटधारक ठेकेदारांशी मूल चे तहसीलदार रविंद्र होली यांची भागीदार तर नव्हेना? असा आरोपही त्यांनी केला आहे.
याकरीता सदरील प्रकरणी निःपक्षपाती चौकशी होणे आवश्यक असल्याचे देखील म्हटले आहे.
सदरील प्रकरणी २०२१ से २०२३ पर्यंत या तीन्ही अधिकाऱ्यांच्या संपत्ती ची चौकशी झाल्याच दुधाचे दुध आणी पाण्याचे पाणी हे सिद्ध होईल असेही शेवटी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment