श्रीरामपूर प्रतिनिधि वार्ता
खेड्यातील शेतकरी,सर्वसामान्य माणूस अनेक समस्यांनी ग्रासलेला असतो, त्याला गट तट, पक्ष फार महत्वाचे नसतात तर सुसह्य जगणं हवं असतं, त्याला समजून घेणारी माणसं हीच खरी सोन्यासारखी होय,असे मत माळेवाडी येथील शेतकरी दत्तात्रय परभतदादा पा. औताडे यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे विजयादशमीच्या निमित्ताने मायभूमीचे पूजन आणि अन्नदाता शेतकरी यांचा सन्मान करण्यात आला, त्याप्रसंगी दत्तात्रय पा.औताडे कृतज्ञतापूर्वक भावना व्यक्त करताना बोलत होते. यावेळी माजी प्राचार्य टी. ई.शेळके, माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रा.शिवाजीराव बारगळ,सौ.अनिताताई औताडे, राहूल औताडे आदी उपस्थित होते.प्रारंभी प्राचार्य शेळके यांनी आपल्या शेतात मातीचे पूजन केले.शम्मीचे झाड,पांडव शस्त्रे, रावण दहन आदी कथाभाग सांगितला.मनातला मळभ जावो आणि नात्यात निर्मळता येवो सांगणारा दसरा सण आहे मोठा नाही आनंदाला तोटा असं जगावं असे संदर्भ विशद केले.प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी विजयादशमीचे पौराणिक आणि कृषीसंस्कृती संदर्भाचे महत्व सांगितले. शेती आणि शेतकरी हेच जगण्याचे दिव्यत्व आहे. नवरात्रपूजन, उपवास आणि धान्य गुणवत्ता लक्षात घेऊन पुढील पेरणी शुद्ध बीजे पोटी फळे रसाळ गोमटी मिळतात,जगातील दुष्टता जावो आणि सुष्ठता नांदो ही प्रार्थना करणे,मनातले वाईट विचार नाहीसे व्हावेत आणि सुविचारांचा प्रकाश पसरो हा संदेश देणारा दसरा शेती, माती, माता,कष्ट साधने, ज्ञानसाधने यांचे पूजन आणि माणुसकीचे दर्शन हेच विचार देणारा विजयी दिवस म्हणजे विजयादशमी होय असे विचार प्राचार्य शेळके यांनी व्यक्त केले.डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सर्वांना पुस्तके भेट देऊन कृषी संस्कृती ही ज्ञानसंस्कृती झाली की शेतकरी समस्या सुटतील, हुशार आणि प्रयोगशील शेतकरी हा सर्वात सुखी असतो. शेतकरी मागत नाही तर तो जगाला देणारा देव आहे,शिक्षण हवे,शेतकऱ्याचे घर पुस्तकांनीही श्रीमंत हवे. प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे यांनी परमपूज्य पांडुरंग शास्त्री यांचे विचार सांगून मनुष्य गौरव दिनाचे महत्व सांगितले. माणसाने माणसाची प्रतिष्ठा जपली पाहिजे, एकमेकांना सन्मान देणे, आदर करणे आणि संकटात उपयोगी पडणे हीच खरी प्रार्थना आहे. श्रीकृष्णचरित्र हॆ माणसाला जगावे कसे हॆ शिकविते असे सांगून त्यांनी सर्वांना मनुष्य गौरव दिनाच्या संदेशपत्रिका दिल्या. राहूल पा.औताडे यांनी आभार मानले.
===================================
---------------------------------------------------
*सहयोगी:*✍️✅🇮🇳...
पत्रकार अफजल मेमन,श्रीरामपूर
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment