राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, October 24, 2023

*श्रीरामपूर जिल्ह्यासाठी* *प्रभू श्रीरामाला साकडे*

*रामायणातील अहिल्या शिळा*
*प्रमाणे श्रीरामपूर व्हावे शाप मुक्त*

श्रीरामपूर -प्रतिनिधि - वार्ता -
गेली बेचाळीस वर्षाचा जिल्हा विभाजन प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आशिया खंडात पहिली औद्योगिक क्रांती जगातील श्रीरामाचे नावाने असलेल्या एकमेव श्रीरामपूर शहरा लगत झाली. मात्र झालेली वाताहत भविष्यातील कायमचे महासंकट समजून गतिमान आणि कार्यक्षम म्हणणारे शिंदे-फडणवीस-पवार -विखे सरकारने तात्काळ श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा. यासाठी त्यांना प्रभू श्रीरामानीच सद्बुद्धी द्यावी, आणि रामायणकालीन अहिल्या शिळा ज्याप्रमाणे शाप मुक्त झाली, त्याप्रमाणे श्रीरामपूर शहर एकदाचे शाप मुक्त व्हावे, यासाठी प्रभू श्रीरामालाच संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांचे अधिपत्याखाली साकडे घालण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष विधीज्ञ सुभाषराव जंगले, अशोकराव बागुल,कार्याध्यक्ष भागचंद औताडे, लकी सेठी, समन्वयक विजय नगरकर, राजेंद्र गोरे, अभिषेक बोर्डे वकिल, समन्वयक विधिज्ञ बाबा शेख, माणिकराव जाधव, शिवाजी सिनारे, संदिप गायधने,प्रा.अशोक रहाणे, बाबासाहेब पवार, अशोक शिरसाठ, भाऊसाहेब काळे, शुभम पाटणी इत्यादी उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र लांडगे म्हणाले, आजची श्रीरामपूरची झालेली वाताहत भविष्यात कोणालाही परवडणारी नसेल. यावर गांभीर्याने आत्मचिंतन व्हावे. गतिमान आणि कार्यक्षम म्हणणारे सरकारकडे एकीकडे निधी नसल्याचे सांगते आणि दुसरीकडे सातत्याने श्रीरामपूरवर अन्याय करत शिर्डीवर एकप्रकारे उधळमाथ्याने उधळपट्टी करत आहे. हे दुर्दैवी बाब म्हणण्याची वेळ आली आहे.
 एकाच दिवशी श्रीरामपूर, बारामती, औरंगाबाद औद्योगिक वसाहतीची उदघाटन झाले. आज श्रीरामपूर औद्योगिक वसाहत दुरावस्थेला जबाबदार कोण ? या मुद्यावर देखील आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. श्रीरामपूरनं असं काय पाप केलं याचं उत्तर देणारांनी यानिमित्ताने पुढं यावे. श्रीरामपूरकरांच्या पाठीमागे कोणीच नसलं तरी श्री रामाच्या रूपानं ईश्वरीय शक्ती आहे. भविष्यात शिर्डीकर आणि श्रीरामपूरकर असं रामायण घडू नये याही विचारांचे आम्ही श्रीरामपूरकर आहोत. श्रीरामपूर जिल्हा हा प्रतिष्ठा आणि भावनिक होत चालला आहे. साठ हजार वर्ष अहिल्या शिळा होऊन पडली होती. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने अहिल्या शिळा शाप मुक्त झाली. तसे प्रभू श्रीरामाचे नावाने पावन झालेला देशातील नव्हेतर जगातील एकमेव श्रीरामपूर शहर आहे. या निमित्ताने श्रीरामपूर शहर शाप मुक्त व्हावे म्हणून श्रीरामालाच साकडे घालण्याची वेळ आली. सर्व जनतेला खात्री आहे की श्रीरामपूर जिल्हा होण्याची शक्ती प्रभू श्रीरामात आहे. आम्ही वाजत - गाजत अयोध्यानगरीत जाऊन आनंदोत्सव साजरा करू. म्हणून संघर्ष समितीने दसरा सणाचे औचित्य साधत श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी प्रभू श्रीरामालाच साकडे घालण्याचा निर्णय घेतला.
निकषाचे आधारे बहुतांशी कार्यालये श्रीरामपुरात चालू आहे. श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी अनेकदा जनआंदोलने झाली. पूर्वीचे वैभव पुन्हा प्राप्त होण्यासाठी लवकरच आक्रमक लढा उभारू असेही राजेंद्र लांडगे शेवटी म्हणाले.

===================================
---------------------------------------------------
*सहयोगी:*
पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -
*9561174111*
---------------------------------------------------
===================================

No comments:

Post a Comment