शिर्डी नजीकच्या बिरोबाबन येथील विरभद्र महाराज मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मंदिरा समोरील चांदीच्या पादुका चोरुन नेल्याची घटना घडली आहे. या चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला माञ तो असफल ठरल्याचे दिसून येत आहे.या घटनेमुळे शिर्डीसह पंचक्रोशीतील विरभद्र भाविकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत असुन विरभद्र मंदिर हे पंचक्रोशीतील अराध्य दैवत आहे यामुळे ही घटना कोण्या परंप्रातीय चोरट्यांनी केली असल्याचा संशय विरभद्र भाविकांनी व्यक्त केला आहे.
येथील मंदिराचे हरीभाऊ भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार राञी एक ते दिड च्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी येथील वाचमनला चाकुचा धाक दाखवून मंदिरात प्रवेश केला यानंतर त्यांनी मंदिराचे पुढील प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व विरभद्र मंदिरातील मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून नंतर मधील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला आहे.माञ यावेळी मंदिरातील दानपेटीचे कुलूप न तुटल्याने त्यांनी मंदिरासमोरील साधारणतः दिड किलोच्या चांदीच्या
पादुका चोरुन नेल्या असल्याचे सांगितले आहे. बिरोबाबन येथील भाविकांनी या घटनेची माहिती देताच शिर्डी पोलीसांनी येऊन पाहणी केली असुन दरम्यान या घटनेमुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. तर अशा विकृत मानसिकतेचा पोलीसांनी तपास करुन कारवाई करावी अशी मागणी नानासाहेब काटकर , संपत जाधव , रमेश बनकर , प्रवीण बनकर , संदिप बनकर , संदिप काटकर , विकास धुळसैंदर , बाळासाहेब काटकर , चेतन बनकर, तसेच विरभद्र भगत हरी बनकर आदीसह शिर्डीसह पंचक्रोशीतील विरभद्र भाविकांनी केली आहे.
===================================
---------------------------------------------------
*पत्रकार अजीजभाई शेख - राहाता*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment