राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, October 5, 2023

*प्राईड अकॅडमी मध्ये विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन बद्दल जनजागृती उपक्रम संपन्न* 🌹🥀🌺🌷🌸🙏❤️ ✅ 🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता
तालुक्यातील भेर्डापूर - वांगी येथील प्राईड अकॅडमी स्कूल व इनर व्हील रोटरी क्लब,श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यामानाने शाळेतील किशोरवयीन
विद्यार्थिनींना सॅनिटरीन नॅपकिन संदर्भात मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा.गोविंद चव्हाण यांनी विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचे महत्व विशद केले. यावेळी बोलताना प्रा.चव्हाण म्हणाले की, भविष्यातील विविध आजार टाळण्यासाठी किशोरवयीन मुलींनी सॅनिटरी नॅपकिन चा उपयोग करावा. आपल्या निष्काळजीपणामुळे विविध कॅन्सर सारखे आजार जडू शकतात. त्यामुळे आपण वेळीच जागरूक राहून सॅनिटरी पॅड चा उपयोग करावा तसेच सॅनिटरी नॅपकिन याचा वापर स्वच्छता व दक्षते संदर्भात मार्गदर्शन प्रात्यक्षिकाद्वारे करण्यात आले प्लास्टिकचा वापर टाळावा हेही त्यांनी यावेळी दाखवून दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संस्थापिका,श्रीरामपूर ता.पंचायत समिती माजी सभापती डॉ.वंदनाताई मुरकुटे,
प्राचार्य प्रीती गोटे, ईनर व्हील क्लबच्या सौ.शीतल कुंदे, सचिव श्वेता शहा, नूतन चव्हाण, शितल जायभाये, सूत्रसंचालन विद्या लोखंडे यांनी केले, आभार जुई मेकडे यांनी मानले.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:* ✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

No comments:

Post a Comment