बेलापूर - प्रतिनिधि - / वार्ता -
रिझर्व्ह बॅकेने नगर अर्बन को.ऑप. बॅकेचा परवाना रद्द केल्यामुळे ठेवीदारांचे मोठ्या कष्टाचे,घामाचे पैसे मिळावे या मागणीसाठी बॅकेचे स्थानिक सल्लागार व सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत डावरे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त ठेवीदारांनी बॅकेसमोर आक्रोश व आत्मक्लेश आंदोलन केले.
यावेळी आंदोलकासमोर बोलतांना डावरे म्हणाल की,सुमारे १३० वर्षाची प्रदीर्घ परंपरा जोपासणारी ही बँक काही बँक लुटारुनी लुटली.त्यामुळे आज बँकेसमोर येवून आज माझ्यासह सर्वाना आपल्या सर्वाना भीक मागण्याची पाळी आली.
आर्थीक गुन्हा-अन्वेषण शाखेने ज्यांच्यावर दोषी असल्याचा ठपका ठेवला अशा बॅक लुटारु व कर्ज बुडवे यांना कोणीही पाठीशी न घालता त्यांच्या प्रॅापट्या जप्त कराव्यात.बॅकेच्या कोणत्याही स्थावरमालमत्तेस हात न लावता आम्हा ठेवीदारांचे पैसे व्याजासह परत करावे अशी मागणी यावेळी केली.
यावेळी सुजीत सहानी, सोन्याबापू भांड,
सुरेश कुर्हे,प्रभाकर तापकिरे, लक्ष्मिकांत उंडे,वेणुनाथ कोतकर राजेंद्र राशिनकर, एकनाथ नागले,सुजित ,प्रफुल्ल डावरे, मोहन भगत,सोमनाथ शिंदे अनिल बेळे उपस्थित होते.
===================================
---------------------------------------------------
*पत्रकार अमन सय्यद - बेलापूर*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:* ✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment