💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी वस्ताद लहुजी साळवे यांनी मोलाचे योगदान दिले तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करत देशातील जनतेला इंग्रजांविरोधात लढण्याची प्रेरणा दिल्याचे जिल्हा बँकेचे संचालक तथा श्रीरामपूर नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी म्हटले आहे.
श्रीरामपूर शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित क्रांतिवीर लहुजी साळवे भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती प्रसंगी ससाणे बोलत होते. यावेळी वस्ताद लहुजी साळवे व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी नागराध्यक्ष संजय फंड, काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, माजी नगरसेवक के सी शेळके, दिलीप सानप, दिलीप नागरे, रितेश रोटे, आशिष धनवटे, शशांक रासकर, सुहास परदेशी, प्रवीण नवले, अशोक जगधने, सुरेश ठुबे, रितेश एडके, मंगलसिंग साळुंखे, पुंडलिक खरे, सुनील साबळे, युनुस पटेल, सुनील ससाणे, युवराज फंड, गोपाल लिंगायत, सनी मंडलिक, रियाजखान पठाण, सरबजीतसिंग चुग, वैभव पंडित,नजीरभाई शेख, बुरहानभाई शेख, कुंदनसिंग जुनी, रितेश गिरमे, बाबा वायदंडे, लक्ष्मण शिंदे, गणेश काते, योगेश गायकवाड, गोपाल भोसले, आकाश जावळे, विशाल साळवे, संजय गोसावी, अजय धाकतोडे, राजेश जोंधळे, कल्पेश पाटणी, श्रेयस रोटे, तीर्थराज नवले, सागर दुपाटी,शिवतेज गोसावी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
===================================
---------------------------------------------------
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर*
------------------------
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment