राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, December 25, 2023

नाताळ प्रेम, सद्भावना आणि बंधुत्वाचे प्रतीक - करण ससाणे🌹🥀🌺🌷🌸🙏♥️✅🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि - /  वार्ता -
जगभरामध्ये तसेच भारतामध्ये नाताळ मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणजेच नाताळ हा सण प्रेम, सद्भावना आणि बंधुत्वाचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले आहे. सर्व ख्रिश्चन बांधवांना ख्रिसमस नाताळ सणानिमित्त शुभेच्छा प्रसंगी ससाणे बोलत होते. 
ससाणे पुढे म्हणाले की नाताळनिमित्त ख्रिश्चन बांधव एकमेकांना शुभेच्छा देत सामाजिक सलोखा जपतात. या दिवशी सांताक्लॉज लहान मुलांना मिठाई व भेटवस्तू देतात असे मानले जाते. परंपरावादी ख्रिश्चन बांधवांसाठी हा सण प्रार्थना आणि आत्मशुद्धीचे कारण असते. भारतीय धर्म संस्कृतीशी ऋणानुबंध जोडून जगभरातील लोकांना प्रेम व एकतेने राहण्याचा संदेश या सणाच्या माध्यमातून दिला जातो. नाताळ सणानिमित्त परमेश्वर येशू ख्रिस्ताद्वारे शिकविल्या गेलेल्या क्षमा बंधुत्व आणि त्याग यासारखी मूल्य समाजात रुजवली जातात. याप्रसंगी आमदार लहु कानडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश आदिक,जि.प.चे माजी सभापती बाबासाहेब दिघे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले, माजी नगरसेवक दिलीप नागरे, प्रकाश ढोकणे,सुरेश ठुबे, रितेश एडके, वैभव पंडित आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ख्रिसमस नाताळ सणानिमित्त ससाणे यांनी श्रीरामपूर मधील सर्व ख्रिश्चन बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजू मिर्जा*
=============
(ब्यूरो चिफ - नाशिक विभाग)
*संकलन*✍️✅🌹
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर 
*9561174111*
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment