राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, December 30, 2023

नवीन वर्ष 2024 सर्वाना हार्दिक शुभेच्छा भेच्छा...


*दिवस जेव्हा पंख लावतात ...*

*नवीन वर्षाच्या स्वागतासाठी*

*प्रत्येक मन आता सज्ज होतंय*

 *झालं गेलं विसरून जाऊन,*

*पुन्हा नव्याने प्रवाहात येतंय* 

आयुष्य नावाची नदी सतत पुढे पुढे वाहणारी आणि भला बुरा प्रत्येक क्षण आपल्या सोबत पुढे घेऊन जाणारी.
जन्मापासून मृत्यू पर्यंत माणूस वर्ष नावाचे गणितीय आकडे मोजत असतो.या आकड्यातून आपल्या जीवनाचं समीकरणही सोडवत असतो.खरं तर माणसाला आपल्या वयाचे वर्ष दाखवणारे अंक म्हणजे जीवन प्रवासात उभे असलेले मैलाचे दगड भासत असतात.वर्ष बदलतात, महिने बदलतात, दिवस बदलतात पण आज गेलेला दिवस मात्र परत कधीच येत नसतो. खरं तर कालमर्यादा ही प्रत्येक सजीवाला असते.तरी सुद्धा लाभलेल्या या मर्यादेत आलेले नवे वर्ष आपण नव्या जोमाने आणि उत्साहाने साजरे करत असतो.

*दिवस जर पाखरू असते तर त्यांना सोन्याच्या पिंजऱ्यात बंदी करून सोन्याचं धान्य खायला दिलं असतं आणि उडूच दिलं नसतं*

गेलेले दिवस परत येत नसतात आणि येणारे दिवस कसे असतील याविषयी मनात अनिश्चितता असते.मग माणूस यातूनच भूतकाळात रमतो. आयुष्यातलं एक वर्ष कमी होतंय ही खंत ही कुठेतरी मनात लपलेली असते.गेलेले दिवस आठवत असतात.काही चांगल्या आठवणी, काही कटू आठवणी मनात सतत रुंजी घालत असतात.भविष्याविषयीची स्वप्नं,आशा - आकांक्षा आणि उत्सुकता मनात असते. म्हणूनच तर जीवनात येणाऱ्या प्रत्येक नव्या दिवसाकडून आपल्याला काही तरी हवं असतं. सरलेलं हे वर्ष आता आपला भूतकाळ होणार आहे आणि असंख्य अशा आठवणी काळाच्या पटलावर कोरून हे वर्ष कायमचं लुप्त होणार आहे.पण माणूस भूतकाळाच्या साखळदंडाने कर्कचून बांधण्यासाठी जन्माला आलेला नाही तर त्या साखळ्या तोडून तो नव्या भविष्य काळातही तितक्याच आतुरतेने प्रवेशासाठी सज्ज होतो. म्हणूनच तर तो येणाऱ्या प्रत्येक नववर्षाचे स्वागत मनापासून करतो. आयुष्याचं
 सिंहावलोकन करताना काय कमावलं काय गमावलं आणि ओंजळीत काय शिल्लक राहिलं याचा हिशोबही माणूस एकांतात करत असतो. रिकाम्या ओंजळी त्याला त्याच्या अपयशाची जाणीव करून देत असतात तर भरलेल्या ओंजळी आकाश ठेंगणे झाले आहे या भावनेने बांधलेल्या असतात. सगळेच दिवस काही आपले नसतात. काही संघर्षाला दान ही करायचे असतात. म्हणूनच या काळात नव्याने उगवण्यासाठी शांतपणे आतल्याआत कोंडून घ्यावं लागणार असतं,तो धीर तो संयम आपल्या प्रत्येकात यायला लागला कि समजून जावं आता आपण परिपक्वतेच्या उंबरठ्यावर आहोत. यशाचा उन्माद आणि जल्लोष व्यक्त करताना जेव्हा *हे दिवस ही जाणार आहेत* याचे भान माणसाला येते, तेव्हाच तो दुःखाच्या कातरवेळीही संयमित अवस्थेत राहतो. या जगात चिरकाल टिकणारे असे काहीच नाही.सारे काही काळाच्या ओघात नष्ट होणारे आहे ही जाणीव माणसाला माणूस बनायला पुरेशी आहे. जुन्या वाटा बंद झाल्या तरी माणसानं चालणं थांबवायचं नसतं तर जुन्या वाटांना फुटलेल्या पाऊलवाटांवरून नवा प्रवास सुरू करायचा असतो.त्याचप्रमाणे जुने वर्ष जरी संपलं तरी मागचे अनुभव गाठीशी ठेवून या वर्षात येणाऱ्या नव्या अनुभवांना मनात जागा रिकामी करून द्यायची आणि आनंदाला आपलेसे करायचं. ज्याचा त्याचा आयुष्य नावाचा ग्रंथ वेगवेगळ्या संघर्षांनी आणि अनुभवांनी समृद्ध झालेला असतो.जुन्या वर्षात साथीला असणारे आणि आपल्या सुखदुःखात सहभागी असणारे आपले अनेक प्रियजन कदाचित आपल्यात नसतील,
त्यांचा विरह सहन करत सर्वांना पुढं जावचं लागेल.आयुष्य म्हणजे काही फक्त फुलांच्या पाकळ्या अंथरलेला रस्ता नाही तर त्याच रस्त्यावर खाच खळगे आणि काटे ही असणारच.ही तयारी ठेऊन जीवन प्रवासात उतरलेली माणसं पराभवाला घाबरत नाहीत आणि विजयाच्या यशाने हुरळूनही जात नाहीत. 
नव्या वर्षाचा हा आपला प्रवास आपल्याला माणूस म्हणून अधिक समृद्ध करून जावा हीच एक अभिलाषा मनात ठेवून नवीन वर्षाच्या अनंत शुभेच्छा देऊ या.
या वर्षाचा आज शेवटचा दिवस.मावळत्या दिनकराला साक्षी ठेऊन आपण ही जीवनात घडलेले कटू अनुभव विसरून जाऊयात.
उद्या येणारा सूर्योदय सर्वांच्याच आयुष्यात आशेची नविन किरणे घेऊन येवो.
=================================
-----------------------------------------------
*सुजाता नवनाथ पुरी*
      अहमदनगर
     *8421426337*
==================
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================



No comments:

Post a Comment