राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, December 31, 2023

*जागृत देवस्थान डोमेगाव !*


डोमेगाव हे अहमदनगर
जिल्ह्यातील श्रीरामपूर (बेलापूर) तालुक्यातील सुमारे २१ किलोमीटर दूर गोदावरी नदीकाठी वसलेले १५० घरे आणि १५०० लोकवस्तीचे छोटेसे गाव आहे .
या ठिकाणी गुरु ग्रंथ साहेबजींची गुरुमुखी लिपीमध्ये
 हस्तलिखित पोथी असून तेथे गुरुग्रंथजींची इष्टदेव म्हणून पूजा केली जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ठिकाणी एकही शीख व्यक्ती राहत नाही.मुख्यतः हिंदू परिवार तुरळक मुसलमान किंवा इतर धर्माच्या लोकांचे वास्तव्य आहे. गावात गुरुद्वारा शेजारी
 महानुभाव पंथाचे आश्रम असून समोरच दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे, जवळच कमालशाह चा मकबरा असून ढिगु मेघु मातंग संप्रदायाचे स्थान सुद्धा गावात आहे.
साधारण १८० वर्षांपूर्वी इसवी सन १८८४ च्या
 दरम्यान एक उदासी साधू पंजाब मधून तीर्थ यात्रा
 करीत नाशिकवरून नांदेड येथे जाताना या

नदीकिनारी असलेल्या ‌एकांत स्थान बघून थांबले. उदासी संप्रदाय हा गुरुनानक देवजींचे ज्येष्ठ पुत्र बाबा श्रीचंद जी यांनी स्थापन केला होता. हे साधू संसारापासून अलिप्त वृत्तीने राहतात.
 लोककल्याणाची कामे करतात. तपश्चर्या करतात. येथे चक्रधर स्वामींचे पुरातन मंदिरे असून रम्य, शांत स्थान आहे .उदासी साधूंकडे एक पुरातन ग्रंथ होता. दिवस-रात्र त्या ग्रंथाचे वाचन ते करीत .त्यांनी बारा वर्ष तिथे गोदावरी किनारी तप केले. दिवसातून एकदा गावात भिक्षेसाठी जात, त्यातून एक भाग गाईला, एक भाग गोदाईला आणि एक भाग स्वतः गृहण करीत. भिक्षा न मिळाल्यास कधी कधी ते फक्त गोदामाईचे पाणी पिऊन राहत. एकदा लोकांनी विचारले बाबा तुम्ही रात्री गोदावरी काठी काय करता? ते हसून म्हणाले,"मी गोदाई जवळ बोलत बसतो .गाढि नावाचा कुंभार होता त्याने प्रचिती
बघण्यासाठी अमावस्येच्या रात्री काळे कांबळे
 ओढून बाबांच्या पाठीमागे लपला. रात्री बारा
 वाजता बाबांनी गोदामाई कडून पाणी मागितले पण
 माईने पाणी दिले नाही.वारंवार प्रार्थना केल्यानंतरही माई बोलली नाही तेव्हा बाबाजी
 म्हणाले देवी असे पूर्वी कधी घडले नाही .
 माझ्याकडून काही चूक झाली आहे,पाप झाले आहे का ?, जर तू माझ्याशी बोलली नाही मला पाणी दिले नाही तर मला प्रायश्चित करण्यासाठी जलसमाधी घेणे क्षेयस्कर होईल. गोदावरी आई पळभरात बाहेर आली आणि म्हणाली आज तुझी परीक्षा घेण्यासाठी कोणी तुझ्या मागावर आहे.बाबांना वाईट वाटले. ते म्हणाले अशा व्यक्तीचा वंश नाश होवो, जो माझ्या देवीच्या भेटीसाठी अडथळा आणत आहे. तेव्हा तो कुंभार घाबरला आणि गावात जाऊन सर्वांना घडलेली घटना सांगू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व गावकरी
बाबांकडे आले आणि शाप मुक्त करण्याची विनंती करू लागले. परंतु ते बाबांच्या हाती नव्हते. ते म्हणाले जर तुला मुलं झालीच नाही तर वंशनाशाचे दुःख तुला भोगावे लागणार नाही .तो निपुत्रिक राहिला.त्याचे घर गुरुद्वाराच्या मागेच होते ती जागा कालांतराने गुरुद्वारा साहेब साठी खरेदी केली
 गेली.ग्रामपंचायतेने सुद्धा जागा उपलब्ध करून
 दिली. आज तेथे एक भव्य दिव्य गुरुद्वारा साहेब
सुशोभित आहे.
 एकदा गोदावरी नदीला भयंकर पूर आला आणि गाव पूर्णपणे बुडू लागले तेव्हा साधू बाबांनी आपली पोथी डोक्यावर घेतली आणि ते पुराच्या पाण्यात उतरले तसे तसे पाणी ओसरू लागले. अशा प्रकारे जेव्हा जेव्हा नदीला पूर येई तेव्हा बाबाजी पोथी डोक्यावर घेऊन पाण्यात उतरत आणि पाणी उतरू लागे. गावाचे रक्षण होऊ लागले .बारा वर्ष बाबाजी तेथे तपश्चर्या करीत होते. पोथी वाचत होते. त्यानंतर एक दुसरे वृद्ध बाबा तेथे आले त्यांनी पोथीची सेवा केली ती पोथी एका खोलीत ठेवण्यात आली .एकदा पुराचे पाणी गावात शिरले आणि ग्रंथाच्या दर्शनाने पाणी ओसरले. गावाचे रक्षण या पोथीमुळे होते अशी लोकांची श्रद्धा झाली आणि पोथीला रक्षक देवता म्हणून महत्त्व प्राप्त झाले. दरवर्षी स्थानिक लोक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पोथी डोक्यावर घेऊन गावातून कीर्तन करीत फेरी काढू लागले.यात्रा भरू लागली. अशा एका यात्रेत बेडेकर नावाचा एक शिकलकरी व्यक्ती सामान विक्रीसाठी आला होता. त्याने पोथी चे दर्शन घेतले आणि गुरुमुखी भाषेतील गुरु ग्रंथसाहेब जी बघून आश्चर्यचकित झाला .त्याने श्रीरामपूर येथे जाऊन शिख बांधवांना याची माहिती दिली. त्यावेळी सोमय्या शुगर मिलचे मॅनेजर जे.एस. अहुजा साहेब आणि विना साडी सेंटरचे खेमसिंग बत्रा तसेच इतर शीख बांधव डोमेगाव ला जाऊन गुरु ग्रंथ साहेब जी ची पोथी श्रीरामपूरला आणण्यासाठी विनंती करण्यासाठी गेले.परंतु डोमेगाव चे स्थानिक म्हणाले की हे आमचे इष्टदेव आहेत.आम्ही यांना गावाबाहेर जाऊ देणार नाही. नांदेड चे संत बाबाजींनी मध्यस्थी करून डोमेगाव येथेच गुरुद्वारा बांधण्याचा सल्ला दिला. गुरुद्वारा बीरद बाबा (वृद्ध बाबा) चा शुभारंभ श्रीमान संत बाबा हरिनाम सिंग जी यांच्या शुभहस्ते २५ मे १९६८ साली झाला. येथील स्थानिक लोकांचा या ग्रंथावर अतूट विश्वास आहे,त्यांची श्रद्धा आहे की यामुळेच आपले रक्षण होते ६ ऑगस्ट १९६८ देखील पुराच्या पाण्यापासून गावाचे रक्षण झाले.

या हस्तलिखित ग्रंथाची उंची इतर गुरु ग्रंथ
 साहेबांच्या तुलनेने चौपट आहे. पहिल्याच पानावर ग्रंथांची संपूर्णतेची माहिती दिली आहे. १८४४ मध्ये (,माघ सुधी ५ संमत १९०१) म्हणजे हा ग्रंथ इंग्रजांच्या युद्धाच्या वेळी लिहिला गेला असेल. अक्षरांच्या वळणावरून तीन वेगवेगळ्या लोकांनी हा ग्रंथ लिहिला असावा, तसेच शाई कशी बनवली गेली यासंबंधी विधी सुद्धा लिहिली आहे. १००६ पानांचा हा ग्रंथ आहे .याशिवाय श्लोक तथा गोष्ट मल्हार नाल होई, रतनमाला, हकीकत राजे शिवनाभ की, चरित्र ज्योती ज्योत समावने के, अशी जास्तीची प्रकरणे आहेत. यात गुरुतेघबहादूर जी पर्यंत ज्योती ज्योत संबंधी ची माहिती आहे. एक श्लोक "सबकुछ तुमरे हाथ में" महल्ला १०, गुरुगोविंद सिंग असे लिहिले आहे. परंतु गुरू ग्रंथ साहेब जी मध्ये असे अंकित नाही. या पोथीवरून त्या काळाच्या अनेक गोष्टी समजतात. ऐतिहासिक दस्तावेज आहे .फक्त श्रद्धाच नव्हे तर हा एक ऐतिहासिक ठेवा आहे. याचे जतन करणे आपली जबाबदारी आहे.
 डोमेगाव हे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असून याचा प्रचार होणे गरजेचे आहे. सरदार रणजीत सिंग अहुजा हे सध्या गुरुद्वाराचे अध्यक्ष आहेत. गोरे ताई गावाच्या सरपंच आहेत. दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या रविवारी येथे जोडमेला होतो, म्हणजेच
 गुरुशी एकरूप होणे असा अर्थ आहे. यासाठी कथा
 ,कीर्तन, संत समागम होत असतो. यात सर्व
धर्मीयांचा सहभाग असतो.
धार्मिक समभाव वृद्धीगत व्हावा, लोककल्याणाची कामे व्हावी अशी परमेश्वराकडे प्रार्थना करते.

🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*संदर्भ:*
सीसगंज पत्रिका नवंबर २००६
कर्नल डॉ. दलविंदरसिंघ गरेवाल
*वाहेगुरुजी का खालसा वाहेगुरुजी की फतेह
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
=================================
*डॉ.कमलजीतकौर बतरा*
श्रीरामपूर - 9890280267
विशेष सहयोग
*डॉ.बापुराव उपाध्ये*
=================================
*पत्रकार राजु मिर्जा*
(ब्यूरो चिफ - नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
=================================




No comments:

Post a Comment