- वजीर शेख - / पाथर्डी -
मुंबई - आग्रा महामार्गावरील पिंपळगांव बसवंत येथील टोलनाक्यावर भारत सरकार अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या अन्याय अत्याचार निर्मुलन समिती व रिपब्लिकन पार्टी आँफ इंडीयाच्या वतीने समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष व रिपाईचे राज्य उपाध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांचे नेतृत्वाखाली टोलविरोधात निदर्शने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे संयोजक रिपाईचे निफाड तालुकाध्यक्ष महेंद्रभाऊ साळवे यांनी केले होते. निदर्शनात टोलप्रशासन व कर्मचारी यांची प्रवाशी व लोकप्रति निधीबरोबर सुरु असलेली आरेररावी थांबविण्यात यावी. टोल नाक्यावरील व टोल आखत्यारीत येत असलेल्या रोडच्या कडेचे बेदाणे व्यापार, चहाच्या टपऱ्यांवर अतिक्रमण काढण्यात आलेत ते पूर्ववत करावे, टोलनाक्यावरील सुलभ शौचालय व स्नानगृह यांची त्वरीत दुरुस्ती व स्वच्छता करावी इत्यादी मागण्यांबाबत टोल चे व्यवस्थापक आत्माराम यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी टोल गेटपर्यंत रॅलीने घोषणाबाजी करुन पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. टोलनाक्या अखत्यारीत रोडवरील बेदाणा व्यापारी व चहाटपरी धारकांचे काढलेले अतिक्रमण त्वरित पूर्ववत सुरु करावे तसेच लोकप्रतिनिधीं व प्रवाश्यांबरोबर सन्मानपूर्वक वागावे तसेच वरील निवेदनातील आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर टोलनाका बंद पाडण्याकरीता आंदोलन घेण्यात येईल असा इशारा यावेळी रविंद्र जाधव यांनी दिला.
या निदर्शनास रफीक सैयद, प्रदीपनाना गांगुर्डे,
संजयबाबा गायकवाड, शशीभाऊ जाधव, अशोकभाऊ गांगुर्डे, प्रदीप पगारे, अजय शेजुळ, विनोद शिंदे, नितीनकाका खडताळे,रोहीणी वाघ, राजनंदीनी आहीरे, संगीता पवार, फरजाना शेख, प्रमोद शिंदे, निर्मला गायकवाड, सुदेश गांगुर्डे, राहुल ढेंगळे, रोहीत गायकवाड, वैशाली पवार, वैभव पगारे आदींसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
या ठिकाणी ए.पी.आय. निकम, ए.एस.आय.तेलुरे, पो.ह.गांगुर्डे, पो.काॅ. शिंदे, आदींनी चोख बंदोबस्त ठेवला. आभार प्रदीपनाना गांगुर्डे यांनी मानले तर राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता करण्यात आली.
=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजु मिर्जा*
(ब्यूरो चिफ: नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment