🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
- श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देशाला जय जवान जय किसान चा नारा देऊन शेती, शिक्षण आणि कौशल्य विकासाद्वारे देशाला सक्षम बनवण्याच्या दृष्टीने महत्वाचे कार्य केल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक मा.उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले आहे. श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित लालबहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम प्रसंगी ससाणे बोलत होते. ससाणे पुढे म्हणाले की, आपल्या समर्पित सेवेदरम्यान लालबहादूर शास्त्री निष्ठा, साधेपणा व कार्यक्षमतेसाठी जनमानसात लोकप्रिय झाले. लालबहादूर शास्त्री यांच्यावर महात्मा गांधीजींच्या राजकीय शिकवणीचा व तत्त्वांचा मोठा पगडा होता. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य साधेपणाने व गोरगरिबांच्या सेवेसाठी व्यतीत केले. लालबहादूर शास्त्री यांनी देशासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, शंकरराव फरगडे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे सरवरअली मास्टर, सुरेश ठुबे, डॉ. राजेंद्र लोंढे, सुनील साबळे, अशोक जगधने, सनी मंडलिक, सरबजीतसिंग चूग, रियाजखान पठाण, युनूस पटेल, रितेश चव्हाणके, लक्ष्मण शिंदे, योगेश गायकवाड, अजय धाकतोडे, गोपाल भोसले, राजेश जोंधळे, सुरेश बनसोडे, कल्पेश पाटणी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजु मिर्जा*
(ब्यूरो चिफ नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment