- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व संपूर्ण जगाला भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख करून देणारे स्वामी विवेकानंद यांनी जगाला मानवतेची शिकवण दिल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले आहे. श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती प्रसंगी ससाणे बोलत होते. ससाणे पुढे म्हणाले की राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात कर्तुत्वाची ठिणगी टाकून आदर्श राजकारण व देश प्रेमाचे धडे दिले. राजमाता जिजाऊ त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जातात. त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी जगभर प्रवास केला. स्वामी विवेकानंदांचे विचार संपूर्ण मानव जातीला प्रेरक आहेत. तरुणांना मार्गदर्शन, देशसेवा, धर्म जागृती अशी अनेक कार्य त्यांनी स्वीकारली. निस्वार्थी मानव सेवा हाच खरा धर्म असल्याची शिकवण स्वामीजींनी दिली. पाश्चात्य जगात त्यांनी भारताचे
आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दूत म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली . यावेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर,मा. नगरसेवक के. सी. शेळके, मुन्नाभाई पठाण, रितेश रोटे, दिलीप नागरे, आशिष धनवटे, प्रविण नवले, काँग्रेस सेवा दल चे अहमदनगर जिल्हा मुख्य समन्वयक मास्टर सरवरअली सय्यद, सुरेश ठुबे, अशोक जगधने, डॉ. राजेंद्र लोंढे, सुनील साबळे, युवराज फंड, रियाज खान पठाण, भगवान जाधव, युनुस पटेल, सनी मंडलिक, रितेश चव्हाणके, लक्ष्मण शिंदे, योगेश गायकवाड, दिपक संगवी, संजय गोसावी, राजेश जोंधळे, सुरेश बनसोडे, विशाल साळवे, गोपाल भोसले, आकाश जावळे, जियान पठाण, श्रेयस रोटे, तीर्थराज नवले, कल्पेश पाटणी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजु मिर्जा*
(ब्यूरो चिफ: नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment