राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, January 2, 2024

“क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचे आमच्या जीवनातील महत्व”


म्हणतात ना एक पुरुष शिकला की एक घर शिकतो परंतु एक स्त्री शिकली की संपूर्ण समाज शिकतो. याचा अर्थ असा होतो की स्त्री शिक्षणाला किती महत्त्व आहे. असेच काही अनन्यसाधारण महत्त्व आमच्या जीवनात सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख या दोघींचे आहे. सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख नसत्या तर कदाचित स्त्रियांचे जीवन आजवर अर्थहीनच असते. कारण जीवनाला खरा अर्थ हे शिक्षणामुळेच मिळतो. त्यांनी केलेल्या प्रयत्नातून, संघर्षातून आज स्त्रीयांना महत्व आहे. अनेक रूढी परंपरा, अंधश्रद्धा, सती जाणे, बालविवाह इत्यादी गोष्टींचा त्यांनी विरोध करून त्यांना नष्ट केल्या म्हणूनच तर आज आम्ही अभिमानाने जगत आहोत त्यांनी दिलेल्या विश्वासामुळे, धैर्यामुळे आज स्त्रियांना जागतिक स्तरावर सन्मानित केले जाते. असे कोणतेच क्षेत्र नाही जिथे महिला आपले कर्तृत्व दाखवू शकत नाही मग तो सामाजिक क्षेत्र असो किंवा कला, क्रीडा अवकाश,  राजनैतिक व  पत्रकारिता क्षेत्र आज भारतीय महिला आपले सामर्थ्य दाखवताना दिसत आहे आणि ते सुद्धा सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून ती फक्त स्वतःसाठीच नव्हे तर राष्ट्रासाठी देखील कर्तबदारीने काम करीत आहे सावित्रीबाईंनी जसा समाजाचा दृष्टिकोन बदलला आजही अनेक महिला त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याचा यशस्वी प्रयत्न करीत आहे. आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडत आहे. सावित्री एक होत्या परंतु त्यांनी देशाच्या हजारो लाखो स्त्रियांच्या मनात जी  शिक्षणाची ज्योत पेटवली होती ती आजवर पेटतच आहे आणि ती कधी विजणारही नाही. कारण सावित्रीबाईंनी शिव्या, शाप, तिरस्कार बरोबर शेणही सोचले परंतु आपल्या धेय्यापासून खाचल्या नाही, माघार घेतली नाही प्रचंड अडचणींना तोंड देऊन त्यांच्यामध्ये जी ऊर्जा निर्माण झाली त्यापासूनच तर शिक्षणाची ही ज्योत पेटलेली आहे. आणि संघर्षातून मिळालेले यश हे निरंतर असते. आणि म्हणूनच सावित्रीबाईंनी शिक्षणाची पेटवलेली ही ज्योत कित्येक पटीने वाढतच राहणार आहे.
सावित्रीबाईंना साथ दिली त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांचेही आभार मानले पाहिजे परंतु हे तितकेच खरे की जर सावित्रीबाईंच्या मनात इच्छाशक्ती आणि धैर्य नसते तर कदाचित त्या हे मोठे कार्य करू  शकल्या नसत्या कारण कोणतेही कार्य करण्यासाठी मनामध्ये इच्छाशक्ती असणे खूप महत्वाचे असते. त्या  केवळ स्त्रियांसाठीच लढल्या नाही तर संपूर्ण समाजसाठी लढल्या. शिक्षण एक असे शस्त्र आहे की जे समाज बदलू शकतो. हे सावित्री बाईनी ओळखले आणि आपले कार्य सुरू केले. त्यांनी मुलींसाठी शाळा काढल्या , स्वतः शिक्षिका म्हणून काम केले. आणि मुलींच्या मनातील नकारात्मक विचार संपून सकारात्मक दृष्टिकोन, सकारात्मक वृत्त्ती निर्माण झाली. त्यांनी हे पवित्र कार्य केले नसते तर आज कदाचित स्त्रियांना ' चूल आणि मूल '  इतकेच स्थान पुरेसे असते.मग या समाजात पी. टी.उषा , कल्पना चावला , इंदिरा गांधी , लता मंगेशकर , सानिया मिर्झा इत्यांदिसारख्या कर्तुत्वान स्त्रिया झाल्यास नसत्या. सावित्री बाईंनी आपले तन , मन , धन सर्वस्वी पणाला लावून जिद्दीने महिलांसाठी व समाजासाठी जे मोलाचे कार्य केले त्याची आपण परतफेड करू शकत नाही.हा आपण त्यांनी दिलेला शिक्षणाचा वारसा पुढे अवश्य नेऊ शकतो. स्त्रियांनी आपल्या संस्कृतीचा वसा जपून आपल्या मुलींना उच्च शिक्षण देऊन आपल्या राष्ट्राच्या प्रगतीमध्ये त्यांचाही हातभार लागला पाहिजे . शिक्षणाने जग जिंकता येतं , जग बदलतं येतं . हे सावित्री बाईनी आपल्याला दाखून दिले आहे. केवळ स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी जगण्यातच खरे आनंद आहे. हे सावित्री बाईंशी
 शिकावे.
'सत्यासाठी संघर्ष करावा , असत्यला नष्ट करावा.' समाज सावित्री बाईंना कधीच  विसरू शकणार नाही .
“ पेटवलीस तू समाजामध्ये शिक्षणाची ज्योती
  म्हणूनच आज जग सांगत आहे तुझी म्हती ’’
'आणि आम्ही आहोत सावित्रेची लेकी.'
=================================
-----------------------------------------------
*महेजबीन शकील बागवान*
उपशिक्षिका : जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा
बेलापूर, ता.श्रीरामपूर - 9623464737
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment