शिरसगांव - प्रतिनिधि -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगांव ग्रामपंचायतीची
ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
त्यामध्ये महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात
आली.महाराणा प्रताप हौसिंग सोसायटीच्या मूळ प्लॉटधारक ६२ वगळून ज्या बोगस नोंदी झालेल्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या आहेत. बोगस प्लॉट धारकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. ज्या लोकांनी आतापर्यंत पिण्याचे पाण्याचे नळ कनेक्शन्स डीपोझीट भरलेले नाही अशा बोगस कनेक्शनवर दंडात्मक कारवाई करणार असून पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात येतील.शिरसगांव हद्दीतील व्यावसायिक प्लॉटधारक ज्यांनी आजपर्यंत ग्रामपंचायतमध्ये नोंदी केलेल्या नाहीत त्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.रु २५०००/- चे वर जे थकबाकीदार आहेत त्यांचेवर कोर्टात दावे दाखल
करून त्याच्या प्लॉटला सरकार नाव लावण्यात येणार
आहे.
या झालेल्या ग्रामसभेत सर्व विषयावर सविस्तर चर्चा झाली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच राणी वाघमारे ह्या होत्या.यावेळी ग्रामपंचायतीचे नेते गणेशराव मुदगुले यांनी सर्व ग्रामस्थांना सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ, त्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे.आपली घरपट्टी पाणीपट्टी, वेळेवर भरावी.सर्व ग्रामस्थांनी स्वच्छतेला प्राधान्य द्यावे त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहील असे मत व्यक्त केले.ग्रामसभेस सरपंच राणी वाघमारे,उपसरपंच संजय यादव,ग्रामसेवक पी.डी. दर्शने, अशोकराव पवार,सुरेश ताके,बापूसाहेब काळे,भाकचंद जगताप,लक्ष्मण यादव,पाराजी ताके,रंगनाथ ताके,सर्व ग्रा.प.सदस्य ग्रामस्थ,ग्रा.प. कर्मचारी आदि उपस्थित
होते.
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*💐✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
No comments:
Post a Comment