राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, February 3, 2024

जिल्हा कोषागार कार्यालयात लेखा**व कोषागार दिन उत्साहात साजरा

*अधिकारी, कर्मचाऱ्यांनी*
 *उत्स्फुर्तपणे केले रक्तदान*

अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्हा कोषागार कार्यालयात लेखा व कोषागारे दिन अत्यंत उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
संचालनालयातील विविध घटकांना एकत्र आणुन बंधुत्वाची भावना वाढीस लागण्याबरोबरच कोषागार कार्यालयाच्या प्रगतीला चालना मिळावी या उद्देशाने येथील नवीन प्रशासकीय इमारतीमधील जिल्हा कोषागार कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे नियंत्रक सदाशिव पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन धस, विशाल पवार, स्थानिक निधी लेखा परिषदेचे सहायक संचालक बाबासाहेब घोरपडे जिल्हा कोषागार अधिकारी भाग्यश्री जाधव भोसले आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी मनोगतात कोषागाराचे प्रशासनातील महत्व सांगत लेखाविषयक काम पहाणाऱ्या प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी लेखाविषयक काम करताना आपल्या कामात अचूकता ठेवावी, यासाठी सर्व वित्तीय नियमांचा अभ्यास केला पाहिजे, असे सांगितले. कोषागारातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबतही अभिनंदन केले. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.
यावेळी जिल्हा कोषागार कार्यालय व जिल्हा कोषागार कर्मचारी संघटना यांच्यावतीने भव्य अशा रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या रक्तदान शिबीरामध्ये सहभाग नोंदवत उत्स्फुर्तपणे रक्तदानही केले.
कार्यक्रमास लेखा व कोषागार कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
===========
*सहयोगी*
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------=================================


No comments:

Post a Comment