श्रीरामपूर प्रतिनिधि वार्ता
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने श्रीरामपूर येथील दशमेशनगरच्या जय माता दी सांस्कृतिक भवनात सोमवार, दि. १२ ते शनिवार दि. १७ फेब्रुवारी दरम्यान दररोज सकाळी ६ ते ९ या वेळेत आनंद अनुभूती (हॅप्पीनेस प्रोग्राम ) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रदीर्घ अनुभव असलेले स्वामी ब्रम्हचैतन्यजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर होणार आहे. या शिबिरात योगा, प्राणायाम, ध्यान, ज्ञान व विश्र्वभरात प्रसिद्ध असलेली तसेच करोडो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवणारी श्वसन तंत्रावर आधारित असलेली *सुदर्शनक्रिया* शिकवली जाणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी होऊन आपल्या जीवनाला आनंदमय सुखमय बनवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपण तणावमुक्त जीवन कसे जगावे ही कला शिबिरात शिकविली जाणार आहे. या मुळे दररोज आपण दिवसभर उत्साही राहून न थकता सहजपणे कुठलेही टेंगशन न घेता कामकाज करता येणार आहे.
या शिबिरा मुळे आनंदी होणारच याची खात्री आर्ट ऑफ लिव्हिंग चे नियमित साधना करणारे साधक हे ठणकावून सांगत असतात.त्यामुळे आपल्या सारखेच इतरांना ही आनंदी जीवन जगता यावे हाच यां शिबिराचा शुद्ध हेतू आहे. त्यासाठी शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंगच्या साधकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 9767646489 व 9860119094 यावर संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.
=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजू मिर्जा*
==============
(ब्यूरो चिफ: नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment