राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, April 3, 2024

डॉ.राजीव डोंगरे यांना भूमी फौंडेशनचा आरोग्य शिरोमणी पुरस्कार महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते प्रदान*


- शिरसगांव - प्रतिनिधि -/ वार्ता -
भूमी फौंडेशन ही सामाजिक संस्था प्रख्यात सिने अभिनेत्री अलका कुबल यांच्या मार्गदर्शनातून तथा संस्थापक अध्यक्ष प्रा. कैलास पवार यांच्या संकल्पनेतून, लोकसहभागातून विकास हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्रात राज्यभर विविध सामाजिक कार्य करीत आहे.भूमी फौंडेशनच्या वतीने दरवर्षी वैद्यकीय क्षेत्रातील राज्यस्तरीय एकमेव आरोग्य शिरोमणी पुरस्कार दिला जातो.त्यापैकी यावर्षीचा पुरस्कार सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. राजीव डोंगरे यांना मंगळवारी श्रीक्षेत्र गोदावरी धाम सरला बेट येथे सद्गुरू नारायणगिरी महाराज यांच्या १५ व्या पुण्यतिथी सोहळ्यात मठधीपती महंत रामगिरी महाराज यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी महंत रामगिरी महाराज यांनी सांगितले की भूमी फौंडेशन सामजिक संस्था ग्रामीण भागातील वंचित घटकांकरिता कार्य करीत असून हे गौरवास्पद आहे.या सामाजिक संस्थेला सर्व स्तरावर सहकार्य होण्याची गरज आहे.त्यावेळी संस्थापक प्रा.कैलास पवार, प्राचार्य टी इ शेळके,प्रा. डॉ बाबुराव उपाध्ये, प्रा. शिवाजीराव बारगळ, भीमराज बागुल.कचरू महांकाळे यांच्यावतीने महंत रामगिरी महाराज यांचा सत्कार करण्यात आला‌ 
यावेळी दिनकर मगर, राजेंद्र जानराव, बाबुराव मगर, नगराध्यक्ष दिनेश परदेशी. आ.रमेश बोरनारे,आ.लहू कानडे, सिद्धार्थ मुरकुटे, शाबीरभाई, सचिन गुजर,भूमी फौंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब चेडे 
आदी मान्यवर उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
==================
*प्रसिद्धी प्रमुख*
 भूमि फौंडेशन (महाराष्ट्र प्रदेश)
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment