दिनांक ३० एप्रिल २०२४ मंगळवार , रोजी ,
=================================
टाइगर बहुजन फोर्स श्रीरामपूर च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित भीमगीताच्या कार्यक्रमात श्रीरामपूर येथील बैतुशशिफा हास्पिटल चे डॉ सलीम भाई शेख यांचा सत्कार करण्यात आला. वीस वर्षांपासून दरवर्षी पवित्र रमजान महिन्यात " इस्लाम समजून घेताना" नावाची लेखमालिका दर वर्षी न चुकता संपूर्ण महाराष्ट्रात व देशात हाजारों दैनिकांत प्रकाशित उत्कृष्ट लिखान केल्याबद्दल डॉ सलीम सिकंदर शैख यांचा जाहीर नागरी सत्कार श्री संजय रुपटक्के संस्थापक अध्यक्ष टाइगर फोर्स यांच्या हस्ते करण्यात आला त्या वेळी दैनिक लोकमत चे माजी उपसंपादक मिलिंद कुमार साळवे, समाजसेवक गोरख आढाव, शंभूक विद्यार्थी वसतिगृहाचे अधिक्षक श्री.अशोक दिवे सर , समाजसेवक भाई बागुल जी , समाजसेवक लहानुभाउ त्रिभुवन..व टायगर्स फोर्स चे विविध कार्यकर्ते व असंख्य- हाजारों प्रेक्षकांच्या साक्षीने सत्कार करण्यात आला..
====================
!! ईस्लाम :- कामगार - मजुरांची मजुरी त्यांचा घाम सुकण्याआधी चुकती करा " प्रेषित मुहम्मद स्वल्ल. !!
आल्लाहाचे प्रेषित मुहम्मद सल्ल. म्हणतात की" कामगारांची मजुरी त्यांच्या घाम सुकण्याआधी चुकती करा,अदा (देऊन टाका) करावी (इब्ने - माझा हा.नं. २४४३),
अबू -हुरैरा रजि. म्हणतात की, "हजरत मोहम्मद सल्ल.सांगतात की कायामतच्या दिवशी अल्लाहा त्या मानुष्याशी नाराजी करेल ज्या मनुष्याने एखाद्या मजूर कामगारांकडून दिवसभर मजूरी - काम करुन घेतले आणि त्याने केलेल्या मजुरी कामाचा मोबदला दिला नाही "''(सहीह बुखारी २२२७ ,ईबने माझा २२४७),
१ मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिवस,महाराष्ट्रचा "महाराष्ट्र दिन" महाराष्ट्र एकीकरणाच्या वेळेस मुंबई ही महाराष्ट्रातच रहायला हवी यासाठी १०५ (एकशे पाच) जणांनी हौतात्म्य पत्कारत आपले बलिदान दिले,आपण या हुतात्म्यांना मानवंदना देऊन महाराष्ट्र दिन पाळतो,
१ मे हा जगभरातील कामगार चळवळीच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा आंतरराष्ट्रीय कामगार दिन विशेष म्हणजे जगभरातील ८० ((ऐंशी) पेक्षा अधिक देशांमध्ये एक मे या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करुन हा कामगार दिन पाळला जातो. प्राचीन युरोपातील वसंत दिनाच्या दिवशी हा दिन येतो,खास म्हणजे हा दिवस शिकागोमध्ये ४ मे १८८६ मध्ये घडलेल्या हे Hey हे मार्केट दुर्घटनेच्या स्मरणार्थ जगभरातील समाजवादी, साम्यवादी विचारसरणीचे पक्ष साजरा करतात.
१४४० चौदाशे वर्षांपूर्वी अरबस्तानात अमानवी,रानटी, क्रुर अशा अनेक अमानुष प्रथा अशी पद्धतीने गुलामगिरीची पद्धत,शोषण पद्धती होती, त्याकाळात मजुरांना दिवसभर राबून गुलामाला (कामगार) दिवसभर गुलामी करून रात्री छळ करीत व रात्रंभर उपाशी ठेवत असत,भर उन्हा - तान्हात, वाळवंटाच्या वाळूवर भर उन्हात झोपून त्यांचे खूप हाल करीत असत,त्यांनी केलेल्या श्रम - कामाच्या मोबदल्यात त्यांना दोन वेळेचे जेवण देखील देत नसत, जगेल येवढेच अन्न देत असत, अशा प्रकारे कामगारांचा छळ करून त्यांचे अतोनात हाल करायचे,त्याच काळात प्रेषित हजरत मुहम्मद स्व.यांनी गुलामगीरी समुळ नष्टच केली, गुलामांचे व मजुरांचे संपूर्ण हक्क प्रदान करून,गुलामगीरी प्रथा नष्ट करून गुलाम,कामगार,मजुरांना एक मनुष्य म्हणून वागवण्याची तथा वागणूक देण्याची प्रथा सुरु करुन मालकांना एकाप्रकारे तंबीच दिली.
अब्दुल्लाहा बिन उमर रजि. प्रेषितांचे मित्र म्हणतात की,नबी करीम स्व.यांनी सांगितले की, तुमचे नोकर -चाकर हे तुमचे बंधू आहेत,तुम्ही तुमच्यासाठी जे-जे भोजन ग्रहण करता त्याच प्रकारचे भोजन तुम्ही तुमच्या गुलाम- नोकर,चाकरांनाही खाऊ घाला,जे वस्त्र तुमच्यासाठी तुम्ही परिधान करता त्यातील काही वस्त्र तुमच्या गुलाम- नोकर, चाकरांनाही द्या,आपल्या गुलाम-नोकर,चाकरांना स्नेहपूर्वक सौजन्यशील वागणूक द्या,
त्यांच्यावर आत्याचार करू नका, त्यांना जालीमांच्या हवाली करु नका,जे मनुष्य संकटात आपल्या बांधवाची मदत करतात, अल्लाहा करिम त्यांच्या संकटात मदत करतात "'(सहीह बुखारी शरीफ ६०७, २४४२,, ईबने माझा ३६१०, मुस्लिम शरीफ १६६१,),
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या महापरिनिर्वाणानंतर इस्लामचे पहिले खलिफा हजरत अबूबकर सिद्दिक रजि.हे प्रेषित मुहम्मद स्व.यांचे खास मित्र व सर्वांत अगोदर इस्लाम कबूल करणारे इस्लामचे प्रथम खलिफा झाले.
त्यांच्या खलिफा नियुक्तीनंतर त्यांच्या कार्यकाळात त्यांना त्यांच्या एका मित्रांने विचारले की, "तुमच्या वेतनाचे,महिन्याच्या मानधन (पगाराचे) चे काय असले पाहिजे ?,
त्यावर खलिफा हजरत अबु - बकर रजी.म्हणतात की ,एका मजुराला दिवसभरात जी मजुरी असेल तेवढी महिन्याचं मानधन असेल,त्यानंतर त्यांचे सहकारी म्हणतात की,इतक्या अल्प मानधनावर तुमचा उदरनिर्वाह(गुजारण) कसा होईल ?,त्यावर हजरत अबु-बकर रजि. म्हणतात की,मला जर कमी पडले तर मी सर्वप्रथम दिवसभर श्रम - मजूरी काम करील व त्याच्या पगार आणि मजुरीत वाढ करील ज्याने माझे मानधन वाढेल,अशा प्रकारे मी माझे मानधन वाढवील,तसेच दुसरे खलिफा हजरत उमर रजि. हे त्यांच्या कार्य काळात जवळ जवळ निम्म्या जगावर राज्य करीत होते,आपल्या शिस्तप्रिय शासनाच्या कार्यपद्धतीने फार प्रसिद्ध होते,त्यांच्या कार्यकाळात त्यांनाही अशाच प्रकारे प्रश्न उपस्थित केला गेला,त्यावर ते म्हणतात की, यदा कदाचित ही जी दजला नदी आहे त्या नदीच्याकाठी एक कुत्रा जरी उपाशी मरुन पडला तर त्याची जबाबदारी माझीच, म्हणजे ज्यांच्या राज्यात एक कुत्राही उपाशी राहु शकत नाही ज्या कुत्र्याची जबाबदारी त्यांची तर, ते किती मोठे शासक असतील ?, ते कशा प्रकारे आपले राज्य कारभार करीत असतील,
इस्लामची मानव कल्याणकारी शिकवण किती मोठी,म्हणूनच इतिहासकार म्हणतात की, इस्लाम आयाही है गरीबों, बेबसों, गुलामों,मजदूरों,लाचारों,बेसहारों कों इंसाफ दिलाने के लिए....
१ मे हा जागतीक कामगार दिन आपल्या असंख्य कामगार बंधू-भगीनींच्या हक्काचा दिवस आहे,या निमित्ताने सर्व कामगार बंधू-भगीनींना हार्दिक शुभेच्छा.
=================================
-----------------------------------------------
लेखक - डॉ.सलीम सिकंदर शेख ✍️✅🇮🇳...बैतुशशिफा हॉस्पिटल,श्रीरामपुर
९२७१६४००१४
@ डॉ @ स@ लि @ म @ शे@ख@ 🌹🥀🌺🌸🌷♥️
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment