राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, August 1, 2024

कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल सौ.शुभांगी जगताप,राऊत यांचा,डॉ.सुधा कांकरीया यांचे कडून सन्मान


- अहमदनगर - प्रतिनिधी - /वार्ता -
अहमदनगर शहरातील सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित, स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीच्या आद्य प्रवर्तक आणि राजयोगा मेडिटेशन जीवन पद्धतीच्या अभ्यासक डॉ. सुधा प्रकाश कांकरिया यांनी सौ. शुभांगी सुनीत राऊत यांना ' कन्यारत्न प्राप्त झाले म्हणून ' प्रशस्तीपत्र देऊन नुकताच सन्मान केला आहे .
   सौ. शुभांगी जगताप - राऊत ह्या केडगांव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपाध्यापिका व सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मीनाताई अनिल जगताप यांच्या सुकन्या आहेत तर श्रीरामपूर येथील निवृत्त प्राध्यापक रामचंद्र ताराबाई सुंदरदास राऊत यांच्या स्नुषा (सून) आहेत .
   श्री. सुनीत राऊत आणि आताच्या सौ. शुभांगी जगताप - राऊत यांच्या विवाह प्रसंगी डॉ. सुधा कांकरिया यांनी उपस्थित राहून वधू - वरांना शुभ आशीर्वाद दिले होते, आणि सर्व उपस्थितांना ' स्त्री जन्माचे स्वागत करा ' असा शुभ संदेश दिला होता. त्याचप्रमाणे लग्नात सात फेरे झाल्या नंतर स्त्री जन्माच्या स्वागताचा आठवा फेराही घेतला होता.
   सौ. शुभांगी जगताप - राऊत यांना कन्यारत्न झाल्याचे समजल्यावर डॉ. कांकरिया यांनी सौ. शुभांगी जगताप - राऊत यांच्या अ.नगर येथील निवासस्थानी जाऊन त्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान केला. आपण ' स्त्री जन्माचे स्वागत करा ' या चळवळीत सहभागी झालात आपले मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यास अनेक उत्तम हार्दिक शुभेच्छा असे त्यांनी सौ. शुभांगी राऊत यांना दिलेल्या प्रशस्तीपत्रामध्ये म्हटले आहे.
   प्रशस्तीपत्रामध्ये ' लेका एवढीच लेकही भारी , हाच संदेश घरोघरी, आपण सगळे एकत्र येऊ या , स्त्री जन्माचे स्वागत करू या . . . ' या काव्य पंक्ती बरोबरच डॉ . सुधा कांकरिया रचित 'शपथ ' ही काव्य रचनाही प्रकाशित करण्यात आली आहे.
   या प्रसंगी बोलताना प्रा. रामचंद्र राऊत म्हणाले की, आम्हा सर्व परिवाराचे स्वप्न होतं की आमच्या घरामध्ये मुलगी जन्माला यावी आणि परमेश्वराच्या कृपेने आमचे स्वप्न साकार झाले आहे. आमच्या घरी लक्ष्मीच्या पावलांनी ही नात आली आणि खरोखर आमचं संपूर्ण घर प्रसन्न , प्रफुल्लीत झालं, हर्ष व प्रसन्न चित्तानं भरून गेलं असेही ते म्हणाले.
   प्रा. राऊत पुढे म्हणाले की, आमच्या चिरंजिवांनी व सुनबाईंनी लग्नाच्या वेळी डॉ. सुधा कांकरिया यांच्या मार्गदर्शनाखाली जो आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागतासाठी घेतला त्याबद्दल राऊत व जगताप कुटुंबाला खूप आनंद वाटतो .कारण आज समाजात पाहिलं तर समाजाची घडी विस्कटलेली दिसत आहे. आज अनेक वर लग्नासाठी तयार आहेत पण त्यांना वधू मिळत नाही. त्याचे कारणच आहे की स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण समाजात वाढत चालले आहे आणि ते थांबविण्यासाठी म्हणून विवाह संस्कारा सोबतच स्त्री जन्माच्या स्वागताचा हा संस्कार आठव्या फेरा द्वारा घेतला गेला याचा आम्हाला निश्चितच आनंद होतो आहे . त्याबद्दल आम्ही डॉ. सुधा कांकरिया यांचे अभिनंदन करतो.
   समाजातील प्रत्येकाने अशा प्रकारचा स्त्री जन्माचा स्वागताचा संस्कार स्वतःपासून सुरू करावा म्हणजे समाजात सकारात्मक परिवर्तन होईल असेही प्रा . रामचंद्र राऊत म्हणाले .
   या प्रसंगी सर्वश्री संतोष जगताप , सुनिल जगताप , संगीत राऊत, सुनीत राऊत , मयूर जगताप, सौ. रामेश्वरी लाटे , सौ . रेश्मा राऊत , श्रीमती रुक्मिणी जाधव , श्रीमती कमलाबाई जगताप, श्रीमती मीनाताई जगताप, सौ. राजश्री राऊत आदी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment