राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, August 11, 2024

ज्युनियर रेड क्रॉस सोसायटीने दिल्यासीमेवरील सैनिकांना राख्या


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
रक्षाबंधन सणानिमित्त श्रीरामपूर येथील भि. रा. खटोड कन्या विद्यालय व शा. ज.पाटणी विद्यालय मधील ज्युनियर रेड क्रॉस नी राख्या बनविणे कार्यशाळा घेवून आकर्षक राख्या बनविल्या. विविध आकार व रंगात असलेल्या राख्या पठाणकोट व लडाख येथे सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या सैन्यासाठी पाठविलेल्या आहेत.
           दोन्हीही विद्यालयातील मुलींच्या ज्युनियर रेड क्रॉस युनिट ने तयार केलेल्या १५० राख्या रेड क्रॉस अध्यक्ष तथा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांचेकडे सुपूर्त केलेल्या आहेत.
            ज्युनियर रेड क्रॉस युनिट चे विद्यार्थिनींना प्राचार्य विद्या कुलकर्णी, मुख्याध्यापक व्ही. बी. भांगरे, खटोड कन्या चे युनिट प्रमुख अवधूत कुलकर्णी, निर्मला लांडगे,पाटणी विद्यालयाचे युनिट प्रमुख अनूप्रिती पवार,रश्मी कासार, नितीन यशवंत आदींनी बहुमोल मार्गदर्शन केले
             ज्युनियर रेड क्रॉस चे अभिनव उपक्रमाचे अध्यक्ष किरण सावंत पाटील, उपाध्यक्ष मिलिंद वाघ,सचिव सुनील साळवे,खटोड कन्या चेअरमन दत्तू साबळे,पाटणी विद्यालय चेअरमन भरत कुंकुळोल , प्रवीण साळवे, पोपटराव शेळके,सुरेश वाघुले, श्रावण भोसले,गणेश थोरात,सचिन चंदन,केशव धायगुडे,पुष्पा शिंदे,शोभा शेंडगे,सविता साळुंके, साहेबराव रक्ते,ज्ञानदेव माळी, गोरक्षनाथ बनकर, प्रो.सुप्रिया साळवे,आदींनी विद्यार्थिनींनी केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================



No comments:

Post a Comment