<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
==================================
- सातारा...
वीरांच्या भूमीत शांती स्थापून स्वराज्य शुद्ध केले!
राजांनी माता-भगिनींचे पुत्र बंधु नात्याने रक्षण केले,
पिकांच्या देठाची काळजी घेणारे राजे जगात पहिले,
शत्रुची ही मित्रत्वाने कबर बांधताना रयतेने पाहिले!
कवि भूषणने पराक्रमी शिवाजी राजे काव्यात साकारले,
फुलेंनी इतिहासावरची धुळ झटकली तेथे राजे प्रकटले,
करूणा सागर कनवाळू शिवाजी रयतेस कळू लागले !
भीमरायांच्या घटनेत न्यायप्रिय शिवराय राजे दिसले,
भारतीय संविधान बहुजनांच्या उत्कर्षाचे तत्व बनले,
शिवनेरीच्या लेण्यातून समतेचे शीतल वारे वाहू लागले !
जनसागरात दीपस्तंभ, स्वयंभू राजे मार्गदर्शक ठरले,
शूर शिवरायांचे वैचारिक वारस स्वराज्याला लाभले,
शिवाजी कोण होता? पानसरे यांनी पुस्तक लिहिले !
तरुण इथले आपला मार्ग भटकले भगिनीवर धाऊन गेले,
जहरीले किडे शिवरायांच्या भूमित वळवळ करू लागले,
आज सच्चे मावळे दुष्ट प्रवृत्तीशी न्याय विचारांनी लढले !
महाराज सत्यवादी सदैव सत्यानेच यश प्राप्त केले,
स्वकिय जरी उच्चकुलीन तरी धुर्त गद्दारांचे गळे चिरले,
राजांनी सारे इमानदार अस्पृश्य मावळे छातीशी धरले!
थोर पराक्रमी राजां बरोबर मावळे शत्रूशी थेट भिडले,
राजेंनी स्वकियांच्या अन्यायी व्यवस्थेविरुद्ध युद्ध केले ,
राज्याभिषेकाने छत्रपती शिवाजी महाराज धन्य झाले!
बुध्द,शिवाजी,फुले,शाहु,आंबेडकर विचार स्थिरावले,
स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकता फुलांनी बगीचे फुलले,
मानवतावादी विचारांचे मार्ग भारतात प्रशस्त झाले !
डॉ.प्रदीप शिंदे ✍️✅🇮🇳...
छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा
=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment