राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, September 24, 2024

अशोक कामगार पतसंस्थेची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
तालुक्यातील अशोक सहकारी साखर कामगार पतसंस्थेची सन २०२३-२४ या वर्षाची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे अध्यक्षतेखाली संस्थेचे निवृत्तीभाऊ बनकर पाटील सांस्कृतिक भवनमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात संस्थेच्या कामकाजाचा अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रके उपस्थित सभासदांसमोर मांडण्यात आली.
अध्यक्षपदावरुन बोलतांना माजी आ.मुरकुटे म्हणाले की, संस्थेचे संचालक मंडळ सदस्य व सभासद यांचा संस्थेबद्दलचा विश्वास व सहकार्य यामुळे आज अशोक कामगार पतसंस्थेचा नावलौकिक वाढलेला असून ही अभिमानास्पद बाब आहे. कामगारांना स्वावलंबी बनण्यासाठी व त्यांच्या प्रगतीसाठी आर्थिक अडचणीच्या काळात अशोक कामगार पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज रुपाने आर्थिक सहाय्य केले जाते. कामगारांनी आपल्या अपत्यांचे विवाह कार्यात कोणताही अनाठायी खर्च न करता साध्या पद्धतीने विवाह करुन बचत केलेली रक्कम मुलीच्या वा मुलाचे नावावर बँकेत ठेवी स्वरुपात गुंतवणूक करावी जेणेकरुन भविष्यात त्याचा फायदा कुटुंबाला होईल. त्याचबरेबर कामगारांनी आपल्या मुला-मुलींना उच्च शिक्षण दिले पाहिजे, त्यासाठी अशोक शैक्षणिक संकुलामार्फत सर्व सुविधांयुक्त शिक्षणाची सोय उपलब्ध करुन दिलेली आहे. कामगारांनी आपल्या उत्पन्नातील काही भाग बँकेत व संस्थेत गुंतवणूक करुन आयुष्यात स्थैर्य व यश मिळविण्यासाठी आर्थिक बचत करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
प्रास्तविकात संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब दोंड म्हणाले की, अहवाल सालात सभासदांना रु.१ कोटी ४३ लाख कर्ज वाटप केलेले असून संस्थेस रु.३४ लाख ७९ हजार नफा झाला आहे. त्यानुसार सभासदांना ९ टक्के डिव्हीडंड व कर्मचारी बोनसची होणारी रक्कम दीपावलीपूर्वी सभासदांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. यावेळी विषयपत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेस व्यासपीठावर कारखान्याचे व्हा.चेअरमन हिम्मतराव धुमाळ, संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, कार्यकारी संचालक संतोष देवकर, कार्यलक्षी संचालक अशोक पारखे, गिताराम खरात, सामाजिक कार्यकर्ते गणेश छल्लारे, कार्यालय अधिक्षक विक्रांत भागवत, पतपेढीचे चेअरमन भाऊसाहेब दोंड, व्हा.चेअरमन संतोष जाधव, संचालक लव शिंदे, डॉ.मंगेश उंडे, अण्णासाहेब वाकडे, हरिभाऊ गायके, दत्तात्रय झुराळे, संदीप डोळस, भाऊसाहेब आसने, प्रदीप शिंदे, ज्ञानेश्वर मुठे, विकास दांगट, सौ.लिलाबाई बागडे, सौ.नंदा ढुस, सचिव दिपक बडजाते आदी उपस्थित होते.
सभेस कारखाना अधिकारी कृष्णकांत सोनटक्के, सुनिल चोळके, विजयकुमार धुमाळ, रमेश आढाव, ज्ञानेश्वर सांगळे, सुनिल बार्से आदींसह संस्थेचे सभासद व हितचिंतक उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. सभेचे अध्यक्षीय सूचना हरिभाऊ गायके यांनी मांडली, त्यास अशोक पारखे यांनी अनुमोदन दिले. डॉ.मंगेश उंडे यांनी श्रद्धांजली ठरावाचे वाचन केले. विषयपत्रिकेचे वाचन संचालक दत्तात्रय झुराळे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार लव शिंदे यांनी मानले.

*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११

No comments:

Post a Comment