अशोक आयडियल स्कूल च्या विद्यार्थ्यांचे आंतर शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये मोठे यश
लोकनेते मा आ भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले अशोक स.सा. कारखाना संचलित अशोक आयडियल स्कूल,प्रगतीनगर च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारत नुकत्याच पार पडलेल्या आंतरशालेय तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत चौदा वर्षे मुलांच्या वयोगटातील अंतिम सामन्यात विजय मिळविला. या संघाची पुढील स्पर्धेसाठी जिल्हा पातळीवर निवड करण्यात आली आहे. या प्रकारात तालुकास्तरीय अंतिम सामन्यात सलग तिसऱ्यांदा विजेता ठरण्याचा बहुमान अशोक आयडियल स्कूल ला मिळाला आहे, अशी माहिती अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांनी दिली.
तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत चौदा वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने देखील तिसरा क्रमांक पटकावला.त्याचप्रमाणे चौदा वर्षे वयोगटातील क्रिकेट संघाने लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत अटीतटीच्या अंतिम सामन्यात दुसरा क्रमांक पटकावण्याचा बहुमान मिळवला.अलीकडेच झालेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये कु अवंतिका गोंडे आणि कु सेजल काळे विजयी होत त्यांची जिल्हा पातळीवर निवड करण्यात आली.क्रीडा क्षेत्रामध्ये अशोक आयडियल स्कूल चे विद्यार्थी माननीय भानुदास मुरकुटे यांच्याकडून खेळाची तसेच व्यायामाची प्रेरणा घेऊन विविध खेळांमध्ये व स्पर्धांमध्ये यशस्वी होत आहेत.
अशोक आयडियल स्कूलचे प्राचार्य रईस शेख क्रीडा शिक्षक राजू दुधाने व विजयी खेळाडूंचे श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार तसेच अशोक उद्योग समूहाचे प्रमुख लोकनेते भानुदास मुरकुटे, अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका तसेच अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ मंजुश्रीताई मुरकुटे,मुळा प्रवरा वीज संस्थेचे संचालक सिध्दार्थ मुरकुटे, अशोक स.सा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन हिम्मतराव धुमाळ,ऍग्रो इंडस्ट्रीज एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष सोपानराव राऊत,उपाध्यक्ष बाबासाहेब आदिक,सचिव विरेश गलांडे आणी संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
No comments:
Post a Comment