विविध धार्मिक,सांस्कृतिक
कार्यक्रमाचे भव्य आयोजन
- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
तालुक्यातील वडाळा महादेव येथील श्री क्षेत्र रेणुकादेवी आश्रमात संस्थापक मौनयोगी रेवणनाथ महाराज यांच्या प्रेरणेने सालाबाद प्रमाणे शारदीय नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आश्रमाच्या मुख्यविश्वस्त श्रीमती नलिनीदेवी जोशी यांनी दिली आहे.यंदा महोत्सवाचे ४७ वे वर्ष आहे.
गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी पहाटे राजराजेश्वरी रेणुकादेवीची अभिषेक महापूजा होणार असून सकाळी दहा वाजता विधीवत घटस्थापना करून नवरात्र महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे तसेच दुर्गा सप्तशती पाठाची सुरुवात व महाआरती होणार आहे.
सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता ललितापंचमीनिमित्त ललिता सहस्त्रनामावली स्तोत्रपठण तसेच कुंकुमार्चन देवीअष्टक पठण होणार आहे.
बुधवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी षष्ठीनिमित्त पहाटेच्या महाआरतीला आई जगदंबेचा भळंदगोंधळ व जोगवा आणि मंत्र जागर होणार आहे,
गुरुवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी सप्तमीनिमित्त आदिशक्तीचे जाई जुई शेवंती महापूजा केली जाणार असून भाविकांना खिचडी प्रसाद दिला जाणार आहे.
शुक्रवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी उपवास आणि पहाटेच्या आरतीस भाविकांना खिचडी महाप्रसाद दिला जाणार आहे, याच दिवशी दुपारी महानवमी असल्याने नवचंडी होमहवन होणार आहे, सायंकाळी सहा वाजता पूर्णाहूती होऊन कुमारिका पूजन व महाआरती होणार आहे.
शनिवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी सकाळी नवरात्र उत्थापन होणार आहे तसेच कुलधर्म कुलाचार व महानैवेद्य आरती होईल, दुपारी दोन वाजेपासून सिमोल्लंघन व शमीपूजन होणार आहे, सायंकाळी आठ वाजता शस्त्रपूजन , शमी अर्पण आपटापान अर्पण व मंगलऔक्षण होऊन नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे.
नवरात्र काळात दररोज पहाटे ५.३० वाजता निमंत्रित जोडी व लवकर येणाऱ्या जोडीसह महाआरती तर सायंकाळी सहा वाजता उपस्थित जोडीच्या शुभ हस्ते महाआरती होणार आहे. दरम्यान दुपारी चार ते सहा स्थानिक व अन्य भजनी मंडळाचे भजन तर रात्री नवरात्र उपासना होणार आहे. तरी भाविकांनी नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री रेणुका देवी भक्त मंडळ परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment