राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, September 18, 2024

शांतीदूत पैगंबर मुहम्मद स्व सल्लमांच्या जयंती निमित्ताने रक्तदान शिबीरला प्रचंड उत्साहात रक्तदातांचे प्रतिसाद


बैतुशशिफा सोशल फाऊंडेशन,व विद्रोही सांस्कृतिक चळवळ श्रीरामपूर यांचे वतीने कार्यक्रमाचे आयोजन

श्रीरामपूर - "ज्या व्यक्तींने एका माणसाला जीवदान दिले आहे; त्या व्यक्तीने समस्त मानवजातीला जीवदान दिले "' पवित्र दिव्य कुरआन.. यांस अनुसरून हजरत महंम्मद पैगंबर जयंतीच्या निमित्ताने श्रीरामपूर शहरातील डॉ सलीम सिकंदर शेख यांच्या पुढाकारातून बैतुशशिफा एज्युकेशनल व सोशल फौंडेशन व विद्रोही सांस्कृतिक चळवळ व अहमदनगर येथील लोकराज्य सामाजिक प्रतिष्ठान संचलित साई सेवा ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

 सकाळपासूनच भाविकांनी व सर्वधर्मतील नागरिकांनी प्रचंड उत्साहात रक्तदान शिबिरास प्रतिसाद दिला. शिबिरात ६० पेक्षा जास्त रक्तदातांनी रक्तदान केले . त्यांमध्ये अशपाक बाबुलाल शेख यांनी ५६ व्या वेळ होती तर विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष डॉ सलीम शेख यांची वीसावी (२०) वेळ होती, विद्रोही चे अमोल सोनवणे, बॅंक मॅनेजर अकबरभाई शेख, खालीद मोमीन यांनी व अमान एजाज बारूदवाला,रेहान राजू बारूदवाला, अस्लम आली शेख , सैलाणी बाबा दर्गा चे कलीम भाई बिनसाद , काकर समाजाचे अध्यक्ष जावेद काकर ,अरबाज काकर , जावेद कलीम काकर,सर्वात वयोवृद्ध इब्राहिम यासीन मनसुरी, ओवेज काकर, आसिफ काकर, मुन्नवर युसूफ पठाण,साहील सलीम सय्यद, इम्रान कुरैशी,निसार अख्तर शेख ,उमर शरीफ शेख, सिकंदर अमीन पठाण, अन्सार युसूफ जहागीरदार,आवैज शौकत जहागीरदार,आसिफ शौकत सय्यद,आवैज यासीन मोमीन,अमन निसार शेख, रफीक रशिद शाह ,शहारुख अन्सार शेख,इदात गरीब मिर्जा, जावेद चांद शेख, अब्दुल सईद शेख,मुदससर जाफर शेख, लियाकत नूर खान पठाण,सोहैल मोहम्मद सय्यद,जमीर रहेमान शेख,शाहीद समीर पठाण,नाजिद शेख,नसीम मेमन ,आझम आयुब पठाण, तय्यब गणी पठाण,आब्रीहीम रशिद शेख,नबाब पठाण जाहेद इलियास पठाण,अमजद पठाण, रिजवान सलीम पठाण, अस्लम शेख,हजरत शेख,वसीम रसूल पठाण, दाउद इपतेकार सय्यद,शहारूख पठाण, शफीक सय्यद, अंशुमन दिलशाद मलीक , मौलाना किफायतुल्लाह मखदुमी , मौलाना हाफीज कुरैशी जमात खाना, 
    फकीरवाडा येथील नुर मुहम्मद शेख यांनी विशेष करुन आपल्या रक्तदान फेसबुकवर लाईव्ह करून तमाम जनतेला आव्हान केले..
यांच्या सह विशेष बाब म्हणजे अमोल सुरैश सोनवणे व अशोक सखाराम त्रिभुवन या बहुजन समाजातील लोकांनी ही रक्तदान करून आपल्या भावना व्यक्त केल्या. काकर समाजातील लोकांनी अभिमानाने रक्तदान करुन डॉ सलीम यांचा विशेष सम्मान केला .
        रक्तदान शिबिराला तालुक्याचे आमदार श्री.लहु कानडे, तालुका कॉग्रेसच्या अध्यक्ष श्री. अरुण पाटील, अहमदनगर जिल्हा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व मुठेवाडगांवचे पोलिस पाटील श्री.वसंतराव मुठे नी डॉ सलीम शेख साहेबांचे विशेष सत्कार सन्मान केला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ॲड राजेश बोर्डे साहेब, दैनिक सार्वमत चे उपसंपादक श्री.राजेंद्र बोरसे सर ,कॉम्रेड जीवन सुरुडे, कॉम्रेड फय्याजभाई इनामदार, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे सचिव अशोकराव दिवे सर, संघटक अमोल सोनवणे, कायदेशीर सल्लागार ॲड.व कवी.आणणासाहेब मोहन सर व विजय जगताप , वंचित आघाडीचे संतोष त्रिभुवन, राजेंद्र हिवाळे सर, श्रीरामपूर तालुका ग्रामीण पोलीस इन्स्पेक्टर श्री.सतीश गोरे, विशेष म्हणजे एक हिंदू साधुजींनी ही खास उपस्थिती नोंदवली.नगरसेवक हाजी अंजुम भाई शेख व त्यांच्या मित्र मंडळ, अहमदनगर जिल्हा शिक्षक बॅंकेचे चेअरमन सलीम खान पठाण सर, माजी पोलीस इन्स्पेक्टर इब्राहिमभाई शेख , प्रसिद्ध व्यक्तीमत्व कलीम पीर मुहम्मद शेख , शहर कॉंग्रेस सेवा दलाचे रफीक शौकतभाई भाई शेख यांनी पुर्ण वेळ देउन विशेष सहकार्य केले..साजिद मिर्जा, संविधान बचाव समितीचे अध्यक्ष अहमदभाई जहागीरदार, सल्लाउददीन भाई शेख , हाजी फय्याजभाई बागवान,झाकीर शाहा,बिलाल शाहा,सलीम शहा , तन्वीर भाई, खालीद मोमीन, सलीम अली भाई , फईम शेख , अल्तमश पेंटर तसेच काकर समाजातील जिल्हा अध्यक्ष जावेद भाई काकरव साई सेवा ब्लड बँकेचे अजित जगताप व त्यांचे सहकारी, एजाज बारूदवाला, अकबर शेख, राजू बारूदवाला,विविध स्थरातील सामाजिक भान असलेल्या मानवतावादी विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या असंख्य लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. इक्बाल काकर सर यांनी आभार मानले.

=================================
-----------------------------------------------

*लेखन*✍️✅🇮🇳...
डॉ. सलीम सिकंदर शेख
बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर - 
+९१९२७१६४००१४
-----------------------------------------------
=================================
      


No comments:

Post a Comment