- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील स्वर कलारंग सिंगिंग ग्रुप ज्येष्ठ गायिका वैदेही मेंगदे तसेच सहकलाकार यांच्या वतीने श्रीरामपूर येथील अंध शाळेच्या विद्यार्थ्यांना मदतीसाठी दि.२१ रोजी सायं.६.३० वा.
विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रसंगी संगीत प्रेमी रसिक यांच्यासाठी हिंदी मराठी अशा विविध प्रकारचे बहारदार गाण्यांचा कार्यक्रम यावेळी होणार आहे, सायं. ७.३० वाजेपर्यंत येणाऱ्या रसिकांसाठी लकी ड्रॉ कुपन आदि योजना राबविण्यात येणार असून विजेते प्रथम प्रेक्षक यांच्यासाठी चाफानेरकर सराफ यांच्याकडून चांदीचे नाणे बक्षिस म्हणून भेट देण्यात येणार आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृष्णा कलेक्शन, अमर प्युअर व्हेज रेस्टॉरंट, सर्वश्री श्रीकांत दहिमिवाल,अनिल मुखेडकर डॉ. विक्रम आगाशे आदी प्रयत्नशील आहेत,
सदरचा कार्यक्रम विनामूल्य असून अंध विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी ऐच्छिक मदत करणारे रसिक यांनी संयोजन समिती यांच्याशी संपर्क साधावा तसेच मराठी - हिंदी सदाबहार गाण्यांच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहानही संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✍️🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment