राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, October 30, 2024

" भारत रत्न मौलाना आझाद राज्य स्थरीय समाजरत्न पुरस्कार श्रीरामपूरचे डॉक्टर सलीम शेख यांना जाहीर "


- संगमनेर - प्रतिनिधी -/ वार्ता -
संगमनेर - येथील एकता सामाजिक सेवाभावी संस्था.. ही 14 चौदा वर्षा पासून संगमनेर शहर व महाराष्ट्र राज्यात सेवाभावी वृत्तीने काम करीत असते.. एक विशेष बाब म्हणजे एका आशिषित रिक्षा ड्राइव्हर ने ही संस्था स्थापन करून शहर व राज्यातील चांगल्या विचार सरणीच्या लोकांना डॉक्टर, इंजिनीअर, वकील, फार्मासिस्ट, वयोरुद्ध सामाजिक समाजसेवक, सर्व धर्मातील सदस्य लोकांना एकत्र करून फार उत्कृष्ट सामाजिक उपक्रम रबवीत असते. खरोखर फार अभिनंदनीय बाब म्हणावं लागेल निच्छिच . त्या मध्ये खास उपक्रम "पुस्तकं वाचन चळवळ "ते प्रत्येक येणाऱ्या पाहुणे व मित्रांना आपल्या घरी किंवा कोणत्याही समारंभात भेट वास्तू म्हणून पुस्तकं च भेट देणार.. असे विविध उपकृत उपक्रम राबविण्यात येतात.. त्याप्रमाणेच दरवर्षी भारत रत्न व भारत देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या136व्या जयंती च औचित्य साधून त्यांच्या नावाने राज्य स्तरीय समजरत्न पुरस्कार दिला जातो आत्ता पर्यंत राज्य व देशातील विविध कर्तव्य बजावलेल्याच मान्यवरांना दिलेला आहेत.
यंदाही पुरस्कार घोषित करताना कोणत्याही उमेदवाराचे स्वतः चे परिचय न मागता समाजातील विविध गटातील सामान्य लोकांचे मत विचारात घेऊन पुरस्कार घोषित केले गेले अर्थात एक पारदर्शक प्रक्रियेतून.पुरस्कारांची निवड केली गेली.
यंदाच्या वर्षी महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध समाजसेवक व सर्व धर्म आदरभाव जपण्यासाठी कायम अग्रही राखण्यासाठी सतत प्रयत्न करणारे व सामाजिक सदभावना जोपसण्यासाठी सतत कार्यरत असणारे श्रीरामपूर चेवैद्यकीय क्षेत्रात अखंड सेवा देणारे डॉक्टर सलीम सिकंदर शेख -बैतुशशिफा दवाखाना यांना 2024-2025 चा " भारत रत्न मौलाना अबुल कलाम आझाद समाजरत्न पुरस्कार "जाहीर करण्यात आला..
तसेच मौलाना आझाद आदर्श आरोग्य मित्र 2024-25 चा पुरस्कार शहानवाज गणी शाहा यांना :,
    तसेच मौलाना आझाद व्यंग-चित्रकार पुरस्कार अरविंद वसंतराव गाडेकर यांना,जाहीर करण्यात आलेत. 
    तसेच, स्व. मिर्झा खालिद बैग राज्य स्थरिय 2024-25चा "आदर्श समाजरत्न पुरस्कार " अफसर बालम शेख यांना जाहीर करण्यात आला आहेत..
भारत रत्न मौलाना आझाद यांची 136 वी जयंती दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात येतील...
या सर्व मान्यवारां चे विविध थरातून स्वागत होत आहेत...


=================================
-----------------------------------------------
डॉ, सलीम सिकंदर शेख 💐✅🇮🇳...
बैतुशशिफा दवाखाना मिल्लतनगर श्रीरामपूर 
+९१९२७१६४००१४
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment