साहित्यिक अय्युब पठाण लोहगांवकर यांच्या मधूर आवाजाने विद्यार्थी मंत्रमुग्ध
- पैठण - प्रतिनिधी -/ वार्ता -
प्रसिध्द साहित्यिक तथा शाहू विद्यालय जायकवाडी उत्तर ता. पैठण येथील सहशिक्षक अय्युब पठाण लोहगावकर यांनी नुकतेच छ्त्रपती संभाजीनगरच्या जवळ असेलेल्या साजापूर येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेत " मुले रंगली काव्यात " हा धमाल विनोदी एकपात्री आणि संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. यामध्ये श्री.अय्युब पठाण यांनी मधुर आवाजात देशभक्तीपर गीते, भारूड, पोवाडे, पाळणे, शालेय गीते, बोधात्मक विनोदी नकला सादर केल्या. तर बिडकीन येथील शालीमन शिंदे यांनी अय्युब पठाण यांना ढोलकीवर उत्कृष्ट साथ देऊन कार्यक्रमात रंगत आणली. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक धनंजय नागमवाढ हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात साहित्यिका तथा उपक्रमशिल शिक्षिका श्रीमती अलकनंदा घुगे- आंधळे हे होते.तसेच शेख इलियास, अबूजर पठाण, मुदस्सर पठाण यांची कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यास शिक्षक- अनिल जाधव, भास्कर गोपाल, देविदास काळे तसेच शिक्षिका- ज्योती ढोमणे, अश्विनी मोरे, प्रिती गंगवाल, सोनाली रेसवाल यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment